Balaghat Farms Beed

Balaghat Farms Beed Sahyadri Balaghat Farmer Producer Company i.e. Balaghat Farms a farmer-owned initiative. At Balaghat

चीया बियाणे उपलब्ध!नमस्कार!आमच्याकडे चीया बियाणे पेरणी करिता उपलब्ध आहे. हे बियाणे दोन प्रकारनुसार  दर 1100/- (क्लीन ब्ल...
14/10/2023

चीया बियाणे उपलब्ध!

नमस्कार!
आमच्याकडे चीया बियाणे पेरणी करिता उपलब्ध आहे. हे बियाणे दोन प्रकारनुसार दर 1100/- (क्लीन ब्लॅक) व 700/- (ब्लॅक अँड व्हाइट) रुपये प्रती किलो असेल. तरी ज्या शेतकऱ्यांना येणाऱ्या रब्बी मध्ये चिया पेरणी करायाची असेल त्यांनी बियाण्याकरिता खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
ठिकाण - अंबाजोगाई, जी. बीड
दिलदार शेख - 8698887958

धन्यवाद!

#चिया #चीया

सेंद्रिय शेतीमध्ये जो एक मुख्य अडथळा शिल्लक आहे तो म्हणजे रासायनिक तननाशकांना पर्यायी सेंद्रिय तननाशक उपलब्ध नसणे. मजुरा...
22/09/2023

सेंद्रिय शेतीमध्ये जो एक मुख्य अडथळा शिल्लक आहे तो म्हणजे रासायनिक तननाशकांना पर्यायी सेंद्रिय तननाशक उपलब्ध नसणे. मजुरांची टंचाई, मजुरीचे वाढलेले दर, सहज रासायनिक तननाशकांची उपलब्धता, वापरण्याची तुलनेने सोपी वाटणारी पद्धत ई. अनेक कारणांमुळे शेतकरी "तननाशक" विषारी असल्याचे माहिती असून सुद्धा त्याचा वापर रासायनिक शेतीत करताना दिसतात. सेंद्रिय शेतीत तननाशक वापरास परवानगी नाही. त्यामुळे अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळताना अडखळत आहेत.
अमेरिकेतील विएन्ना (वर्जिनिया) प्रांतात राहणाऱ्या एन आर आय गीतांजली पाटील चुरी या इंनोव्हेटर आहेत, व्हील्स ग्लोबल फाउंडेशनमध्ये लाइव्हलीहूड डायरेक्टर राहिल्या आहेत, तसेच त्या नैसर्गिक संसाधनांच्या बाबतीत जागरूकपणे काळजी घेणाऱ्या उद्योजिका आहेत. नुकतेच त्यांनी बीडच्या "बालाघाट फार्म्स" या सेंद्रिय शेतकरी उत्पादक कंपनीला भेट दिली.
त्यांच्या एनर्जी गुरु या कंपनी मार्फत त्यांनी काही सोलर ड्रायर मशीन्स, फार्मिंग रोबो आणि विविध नैसर्गिक उत्पादने बनवली आहेत. यातील विशेष उत्पादन म्हणजे भू-अप (राउंड-अप सारखे) हे सेंद्रिय तणनाशक होय. याचे ट्रायल्स घेण्या बाबत बोलणी झाली आणि उत्पादन, प्रक्रिया, विक्री इत्यादी विविध पातळ्यांवर सोबत काम करण्या बाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली. आमच्या कंपनीच्या तज्ञ अग्रोनोमिस्टच्या मार्गदर्शनात लवकरच याचे मल्टीलोकेशन ट्रायल्स घेऊन परिणाम तपासण्यात येणार आहेत. याला यश आल्यास सेंद्रिय शेती मधील एक मुख्य अडथळा कमी करता येणार आहे.
A major hurdle that remains in organic farming is the non-availability of organic alternatives to chemical w**dicides. Shortage of labor, Increased labor cost, easy availability of chemical herbicides, relatively easy method of use, etc. due to many reasons, farmers are seen using 'Herbicide' (Tannashak) in chemical farming despite knowing that it is harmful. Herbicides/w**dicides are not allowed in organic farming. So many farmers are stumbling to switch to organic farming.
NRI Geetanjali Patil Choori, based out of Vienna (Virginia), USA, is an innovator, Ex-Livelihood Director at Wheels Global Foundation, and a nature-conscious entrepreneur. Recently she visited our organic farming program. She thoroughly inquired and came to know our program and expressed her desire to work with us.
Through her company "Energy-Guru", she has made some solar dryer machines, farming robots, and various natural products. A specialty product is Bhoo-up (like Round-Up) organic w**d control extract. Trials of this were discussed and initial discussions were held on working together at various levels like production, processing, sales, etc. The results will soon be tested by conducting multilocation trials under the guidance of our expert agronomist.

अँलेक्स सॅडलर ही मूळची ऑस्ट्रेलियन पण सध्या इडनबर्ग विद्यापीठ इंग्लंडची पी एच डी ची विद्यार्थिनी. नुकतीच ती सेंद्रिय सोय...
03/05/2023

अँलेक्स सॅडलर ही मूळची ऑस्ट्रेलियन पण सध्या इडनबर्ग विद्यापीठ इंग्लंडची पी एच डी ची विद्यार्थिनी. नुकतीच ती सेंद्रिय सोयाबीन मूल्यसाखळी बाबत अभ्यास करण्यासाठी मानवलोकला भेट देण्यासाठी आली होती. आमच्या टीमने तिला सेंद्रिय शेती बद्दल चाललेल्या प्रयत्नांचे प्रजेन्टेशन दिले. सहभागी सर्व शेतकऱ्यांची माहिती दिली, गावांची यादी दिली.

४२४ सेंद्रिय शेतकऱ्यांपैकी रँडम सॅम्पल नुसार तिने स्वतः निवडलेल्या पाटोदा, हसनाबाद, बनसारोळा, कोळपिंपरी, अंबाजोगाई, देवळा, सारसा, डोंगर पिंपळा ई. गावातील सेंद्रिय शेतकऱ्यांना भेट करून देण्यात आली, त्यांचा ४ दिवस अभ्यास करत अँलेक्सने हसनाबाद, देवळा, सारसा, डोंगर पिंपळा येथील शेतकऱ्यांच्या (विशेषतः महिला शेतकऱ्यांच्या) प्लॉटलाही भेटी दिल्या, बालाघाट फार्म्स मार्फत सुरू असलेली सेंद्रिय शेतमाल खरेदी प्रक्रिया व बोनस पद्धत समजून घेतली.

सेंद्रिय सोयाबीन मूल्यसाखळी बाबत विशेष अभ्यास करण्यासाठी इंग्लंडवरून कुणी अभ्यासासाठी आपल्या गावात आलं, आपल्या सेंद्रिय शेतीच्या प्रयत्नां बाबत जागतिक पातळीवर विशेष अभ्यास सुरू आहे, याचा आनंद आमच्या शेतकऱ्यांचा उत्साह द्विगुणीत करणारा ठरत आहे.

आम्हाला खात्री आहे यातून तयार होणारा अहवाल आणि अँलेक्सचा पी. एच.डी. चा थेसिस नक्कीच आमच्या प्रयत्नांची सिद्धता दर्शवनारा असेल.

Address

Bhir

Alerts

Be the first to know and let us send you an email when Balaghat Farms Beed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Balaghat Farms Beed:

Share