20/02/2026
कृषी माहिती व सल्ला
🌱🌱🌱🌱🌱🌱
*कांदा पिक परागीभवन # मधमाशी कमी असेल तर काय कराल* 🧅🧅
वास्तविकता आणि जास्तीत जास्त उत्पादनासाठी उपाययोजन
कांदा पिकामध्ये मधमाशी कमी प्रमाणात आहे आणि बियाणे उत्पादन कमी मिळेल असे सर्वत्र ऐकायला मिळते आणि शेतकरी मधमाशी संख्या वाढावी म्हणून बरेच जुगाड करताना दिसून येतात, पण त्याचे फायदे होतात का किंवा ते करणे आवश्यक आहे का ? नेमके काय केले पाहिजेत या बाबतीत सविस्तर आणि योग्य ती माहिती यामध्ये दिली आहे.
कांदा हे Cross Pollinated पिक आहे यामध्ये प्रामुख्याने एकाच फुलामध्ये नर आणि मादी असे दोन्ही घटक असतात. कांदा पिकामध्ये Self incompatibility म्हणजे Protandrous कंडीशन असते यामध्ये Anther ( परागकोश) हे stigma ( Gynosium) चे पहिले म्हणजे २-४ दिवस अगोदर तयार ( matur) होतात त्यामुळे खऱ्या अर्थाने येथे सेल्फ पॉलिनेशन होत नाही त्यासाठी त्यांना दुसऱ्या फुलाची आवश्यकता असते म्हणजे कांदा पिकामध्ये पॉलिनेशन हे दोन वेगळ्या फुलांमध्ये होते आणि त्यासाठी दोन्ही फुमधील हे pollination होण्यासाठी माध्यम हवे असते ते म्हणजे @ मधमाशी # घरातील माशी # इतर किडी # हवा आणि वारा # इतर तांत्रिक बाबी असे सर्व
कांदा पिकामध्ये पॉलिनेशन होण्यासाठी काय आवश्यक आहे
१. हवेची किंवा वाऱ्याची झुळक आले तरी पॉलिनेशन होते
2. मधमाशी व इतर किडी यांची संख्या
3. कांदा पिकामध्ये हाताने पिलिनेश करणे म्हणजे आपण पिकामध्ये चालत असतात तेव्हा डेंगळे/ टोळ/ गोट अलगद हलवणे किंवा पिकामध्ये चालत जाणे असे प्रकार आहेत,
यामध्ये मधमाशी चा रोल खूप महत्त्वाचा आहे, परंतु बऱ्याच वेळा कांदा पिकामध्ये मधमाशी दिसत नाही, कारण कांदा पिकामध्ये मधमाशी आकर्षित होत नाही कारण पांढरे फुल आणि कमी प्रमाणात असलेले शुगर नेक्टर,
@ *मधमाशी आकर्षित होण्यासाठी काय कराल*
@ वेगवेगळ्या रंगाची फुले असलेली झाडे लावणे ( झेंडू/ जवस/ मोहरी /. शेपू)
@ त्यानंतर पिकामध्ये पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे जमीन ओली राहील त्याच बरोबर अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे त्यामध्ये
०:५२:३४ किंवा १३:४०:१३ आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा वापर drip मधून करणे
@ पिकामध्ये छोटे माठ अर्धे पाणी भरून ५-१० ठिकाणी ठेवणे
@ शेतामध्ये रसवंती वरील ऊसाचे पाचाट ५-१० वेगवेगळ्या ठिकाणी टाकणे / ठेवणे
@ शेताच्या बांधावर जर हराळी असेल तर तिला फुले येऊ देणे
@ आणि मुख्य म्हणजे मधमाशी साठी हानिकारण असलेले कीटक नाशक फवारणी करणे टाळणे
@ *मधमाशी येत नाही तर वेगळे काय करायचे*
शक्यतो मधमाशी जास्त प्रमाणात दिसत नाही पण तरीही बियाणे भरण्यास अडचण येत नाही कारण आपल्या शेतात जर हवा खेळती असेल तर त्याने सुद्धा पॉलिनेशन होत असते
@ ३-४ दिवसांतून एकदा पिकामध्ये चालत जाणे आणि चालता चालता डेंगळे/ टोळ/ गोट हलके हलवत जाणे ( इजा होईल असे नाही ) त्यातही धोतर किंवा साडी फिरवण्याची गरज नाही फक्त चालत जरी गेलो तरी चालेल
@ फुलोरा अवस्थेत ०:५२:३४ किंवा
१३:४०:१३ १०० gm
Zinc + boron + calcium ३० gm किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड २ आणि
Gebrelic acid ३० ml प्रती पंप याप्रमाणे फवारणी करावी
@ *जुगाडू फवारणीची गरज आहे का ??* तर याचे उत्तर हे नाही आहे उगाच कुठलेही जुगाडू फवारणी करून खर्च किंवा वेळ व्यर्थ घालू नये, मुख्य मुद्दा म्हणजे मधमाशी ही कुठल्याही अनैसर्गिक घटकाला आकर्षित होत नाही आणि त्याचा पाहिजेत तितका फायदा ही होत नाही,
बऱ्याच वेळा धुके किंवा करप किंवा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बियाणे भरण्यास अडचण येते त्यामुळे चांगल्या बुरशी नाशक वेळीच फवारणी आणि अन्नद्रव्ये व्यवस्थापन करण्याची गरज असते,
@ धुके किंवा धुई आल्यास शेतामध्ये शेकोटी करून धूपण करावे, आणि अशा परिस्थितीत चांगले बुरशी नाशक फवारणी करावे
@ बरेच व्हिडिओ आहेत की गुळ / साखर / अजून बरेच काही असे फवारणी करा तर त्याचा काही जास्त फायदा होईल असे वाटत नाही त्याची गरज ही नाही आपल्या शेतात हवा जरी खेळती असली तरीही पॉलिनेशन होते त्यामुळे मधमाशी नाही म्हणून घाबरून जाऊ नये, त्यासाठी वरील प्रमाणे उपाययोजना करा नक्कीच फायदा होईल.
धन्यवाद 🙏🏻