14/04/2026
संध्याकाळी काही चटपटीत खायचे असेल किंवा मुलांना टिफिन द्यायचा असेल आणि हेल्दी पदार्थ हवा असेल तर ही बीटरूट टिक्की चवीला अतिशय चविष्ट आणि दिसायला आकर्षक अशी पौष्टिक डिश आहे.
टिक्की बनवण्याची सोपी पद्धत दिली आहे.
बीटरूट टिक्की रेसिपी
प्रमाण: १२- १५टिक्की
साहित्य
मुख्य साहित्य:
• २ मध्यम बीट (किसलेले)
• २ मध्यम बटाटे (उकडलेले आणि मॅश केलेले) — बाइंडिंगसाठी उपयुक्त
• १ मध्यम गाजर (किसलेले)
• १/२ वाटी पनीर (किसलेले)
• ३/४ कप पोह्यांची पूड)
चवीसाठी:
• ३-४ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
• १ चमचा किसलेले आले
• १ चमचा लाल मिरची पावडर
• १/२ चमचा चाट मसाला
• १/२ चमचा भाजलेली जिरे पूड
• चवीनुसार मीठ
• २ मोठे चमचे ताजी कोथिंबीर (बारीक चिरलेली)
तळण्यासाठी:
• २–३ मोठे चमचे तेल (शॅलो फ्राय करण्यासाठी)
• पर्यायी: रवा किंवा ब्रेड क्रम्ब्स (वरतून घोळवण्यासाठी)
कृती
१. बीट सोलून, किसून घ्या.
२. एका मोठ्या भांड्यात किसलेले बीट, मॅश केलेले बटाटे, गाजर, पनीर हिरवी मिरची, आले, सर्व मसाले आणि कोथिंबीर एकत्र करा.
३. आता यात पोह्याची पावडर घाला. मिश्रण हाताला चिकटणार नाही आणि त्याला पिठासारखा गोळा येईल इतपत मिक्स करा.
४. मिश्रणाचे समान भाग करून छोटे गोळे बनवा. त्यांना हाताने हलके दाबून चपट्या टिक्कीचा आकार द्या.
५. टिक्की अधिक कुरकुरीत होण्यासाठी त्या रव्यात किंवा ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळवून घ्या.
६. फ्राय करा: एका नॉन-स्टिक पॅनमध्ये तेल गरम करा. मध्यम आचेवर टिक्की दोन्ही बाजूंनी ३-४ मिनिटे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
सर्व्ह करण्यासाठी टिप्स
• ही टिक्की तुम्ही पुदिना चटणी किंवा गोड चिंचेच्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करू शकता.
• तुम्ही जर बटाटे खात नसाल, तर त्याऐवजी मॅश केलेले उकडलेले कच्चे केळे वापरू शकता.
#मराठीरेसिपी #रितिकासावंतकिचन