Megha's Kitchen

Megha's Kitchen Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Megha's Kitchen, Kitchen/Cooking, Mumbai.

Megha's Kitchen
नमस्कार मंडळी 🙏 , मेघाच्या किचनमध्ये आपले स्वागत आहे . मी येथे सर्व प्रकारच्या पाककृती शेअर करणार आहे . सर्व पाककृती सोप्या पद्धतीने आणि टप्प्याटप्प्याने सूचनांसह समजावून सांगितल्या आहेत . जेणेकरून कोणीही हे पदार्थ बनवू शकेल .

12/08/2026

अजीबात तेलकट व कडक न होणारी खुसखुशीत बट्टीची परफेक्ट रेसिपी संपूर्ण टिप्ससहित 👍

साहित्य :-

३ वाट्या तयार बट्टीचे पीठ

१ मोठा चमचा ओवा

चवीनुसार मीठ

थोडीशी हळद

पाव चमचा खायचा सोडा

२ मोठे चमचे थंड तेलाचे मोहन

आवश्यकतानुसार पाणी

बट्टी तळण्यासाठी तेल

शिजवणासाठी : -

अर्धा टोप पाणी

१ चमचा तेल

टिप्स :-

तेलाचे मोहन टाकल्यावर बट्टी खुसखुशीत आणि खमंग बनते .

खायचा सोडा वापरल्यामुळे बट्टी हलकी, जाळीदार होऊन खुसखुशीत व्हायला मदत होते आणि अजीबात तेलकट होत नाही.

या बट्ट्या तळण्यासाठी जास्त तेलाची गरज पडत नाही.

या बट्ट्या वरून खुसखुशीत व आतून मऊ होतात आणि लहान मुलांपासून वयोवृद्धांनाही अगदि सहज खाता येतात .

आपल्याला आवडत असल्यास आपण पीठ मळताना पुन्हा थोडे जीरे टाकू शकता.

बट्टीचे पीठ योग्य प्रमाणात बनवलेले असल्यामुळे बट्ट्या खूपच स्वादिष्ट आणि रूचकर बनतात .

दिलेल्या प्रमाण ४ ते ५ व्यक्तीसाठी बरोबर होते.

-* वाढण्याची पद्धत :- ताटात बट्ट्या कुस्करून घ्यायच्या वरून गरमागरम साधे किंवा तिखट वरण टाकायचे आणि व्यावर चमचाभर गावरान तुपाची धार व सोबतीला वांग्याची भाजी घ्यावी आणि दालबट्टीचा आस्कद घ्यावा.

धन्यवाद 😊🙏

11/08/2026

दालबट्टीसाठी परफेक्ट बट्टी कशी बनवायची याची सविस्तर रेसिपी । खुसखुशीत बट्टीची परफेक्ट रेसिपी । Batti Recipe l Bati Recipe l Dalbatti l Dalbati l Batti Recipe in Marathi l Batti Perfect Recipe

साहित्य : -
- ३ वाट्या तयार बट्टीचे पीठ

- १ मोठा चमचा ओवा

- चवीनुसार मीठ

- थोडीशी हळद

- पाव चमचा खायचा सोडा

- २ मोठे चमचे थंड तेलाचे मोहन

- आवश्यकतानुसार पाणी

- बट्टी तळण्यासाठी तेल

- शिजवणासाठी : -

- अर्धा टोप पाणी

- १ चमचा तेल

टिप्स :-

- तेलाचे मोहन टाकल्यावर बट्टी खुसखुशीत आणि खमंग बनते .

- खायचा सोडा वापरल्यामुळे बट्टी हलकी, जाळीदार होऊन खुसखुशीत व्हायला मदत होते आणि अजीबात तेलकट होत नाही.

- या बट्ट्या तळण्यासाठी जास्त तेलाची गरज पडत नाही.

- या बट्ट्या वरून खुसखुशीत व आतून मऊ होतात आणि लहान मुलांपासून वयोवृद्धांनाही अगदि सहज खाता येतात .

- आपल्याला आवडत असल्यास आपण पीठ मळताना पुन्हा थोडे जीरे टाकू शकता.

- बट्टीचे पीठ योग्य प्रमाणात बनवलेले असल्यामुळे बट्ट्या खूपच स्वादिष्ट आणि रूचकर बनतात .

- दिलेल्या प्रमाण ४ ते ५ व्यक्तीसाठी बरोबर होते.

-* वाढण्याची पद्धत :- ताटात बट्ट्या कुस्करून घ्यायच्या वरून गरमागरम साधे किंवा तिखट वरण टाकायचे आणि व्यावर चमचाभर गावरान तुपाची धार व सोबतीला वांग्याची भाजी घ्यावी आणि दालबट्टीचा आस्कद घ्यावा.

नक्की बनवून बघा 😊
धन्यवाद 🙏

08/08/2026

दालबट्टी बनवण्यासाठी बट्टीचे पीठ योग्य प्रमाणासहित 👍

बट्टीचे पीठ योग्य प्रमाणासहित

साहित्य :-

- २ किलो गहू

- अर्धा किलो मका

- २ मोठे चमचे धने

- २ मोठे चमचे बडिशोप

- १ मोठा चमचा ओवा

- १ मोठा चमचा जिरे

टिप्स :-

- सर्व धान्य निवडून घ्यावे नाहीतर पीठात कचकच लागते .

- धने, ओवा, बडीशोप व जीरे टाकल्यामुळे बट्टीला खमंग चव येते .

- हे सर्व धान्य दळून आणताना थोडे जाडसर दळून आणावे . बट्टीचे पीठ आहे असे सांगितल्यावर ते बरोबर दळून देतात .

धन्यवाद 😊🙏

07/08/2026

घरच्याघरी लहान मुलांसाठी झटपट बनवा पौष्टिक पीनट बटर । Homemade Peanut Butter Recipe

साहित्य : -

- १ वाटी शेंगदाणे

- दिड चमचा सूर्यफूल तेल

- १ चमचा गूळ किंवा २ चमचे मध

टिप्स :-

- शेंगदाणे घेताना त्यातील खराब (खऊट) शेंगदाणे निवडून काढून टाकावे. नाहीतर पीनट बटरची चव बिघडेल व कडवट लागेल .

शेंगदाणे मंद आचेवरच भाजायचे तरच परफेक्ट पीनट बटर तयार होते. गॅस अजीबात मोठा करायचा नाही व शेंगदाण्यांना डाग पडू द्यायचे नाहीत .

- हे पीनट बटर खूपच पौष्टिक आहे व खूपच स्वादिष्ट लागते लहान मुले आवडीने खातात .

- हे पीनट बटर बरणीत भरून ठेवल्यास १ महिना सहज टिकते.

धन्यवाद 😊🙏

06/08/2026

उपवासासाठी खरपूस शेंगदाणे भाजण्याची व शेंगदाण्याची साले काढण्याची परफेक्ट पद्धत 👍 । Roasted Peanuts Recipe

04/05/2026

तांदळाच्या पिठाची साठवणीची वाळवणाची २ वर्ष टिकणारी खुसखुशीत चकली 😋

साहित्य : -
- दिड टोप पाणी ( दिड पट )
- १ मोठा टोप रेशनच्या तांदळाचे पीठ ( अर्धा किलो )
- १ फूल चमचा पापडखार
- १ फूल चमचा मीठ
- अर्धा चमचा हिंग
- १ फूल चमचा लाल तिखट
- १ चमचा ओवा
- २ मोठे चमचे तीळ
- १ मोठा चमचा तेल

टिप्स : -
- चकलीचे पीठ पूर्णपणे शिजलेले असेल तरच चकलीची तार एकसारखी येते आणि चकल्यांना छान आकार येतो .
- पीठ कच्चे राहिल्यास चकलीचे तुकडे पडतात .
- शिजवलेले पीठ मळून मऊसर केले तरच एकसारखी चकली तयार होते . डायरेक्ट शिजवलेले पीठ सोऱ्यात भरल्यास चकल्या तर बनतील पण चकलीचा परफेक्ट आकार येणार नाही .
- या साठवणीच्या चकल्या २ ते ३ दिवस कडक उन्हात वाळवाव्यात म्हणजे त्या फुलून छान दुप्पट तिप्पट मोठ्या होतात .
चवीला खूपच स्वादिष्ट होणाऱ्या या चकल्या अजीबात तेलकट होत नाही . खुपच खुसखुशीत व कुरकुरीत होतात .
- चकल्या फक्त सावलीत सुकवल्या तर त्या जास्त फुलत नाही व आतपर्यंत तळल्या जात नाही व कच्च्या राहतात .
म्हणून चकल्या उन्हात वाळवूनच नंतर डब्यात भरून ठेवाव्यात .

धन्यवाद 🙏😊

03/05/2026

तांदळाच्या पिठाची वाळवणाची दुप्पट तिप्पट फुलणारी साठवणीची खुसखुशीत चकली अर्धा किलोच्या योग्य प्रमाणासहित । तांदळाच्या पिठाची साठवणीची चकली । Tandalachya Pithachi Sathavanichi Chakli l Valvan Chakli Recipe l Valvan Chakli l Valvan Recipe l Valvan l Summer Food l Summer Recipe l Rice Flour Chakli l Chakli Recipe l Chakli

साहित्य : -
दिड टोप पाणी ( दिड पट )
१ मोठा टोप रेशनच्या तांदळाचे पीठ ( अर्धा किलो )
१ फूल चमचा पापडखार
१ फूल चमचा मीठ
अर्धा चमचा हिंग
१ फूल चमचा लाल तिखट
१ चमचा ओवा
२ मोठे चमचे तीळ
१ मोठा चमचा तेल

टिप्स : -
- चकलीचे पीठ पूर्णपणे शिजलेले असेल तरच चकलीची तार एकसारखी येते आणि चकल्यांना छान आकार येतो .
पीठ कच्चे राहिल्यास चकलीचे तुकडे पडतात .
- शिजवलेले पीठ मळून मऊसर केले तरच एकसारखी चकली तयार होते . डायरेक्ट शिजवलेले पीठ सोऱ्यात भरल्यास चकल्या तर बनतील पण चकलीचा परफेक्ट आकार येणार नाही .
- या साठवणीच्या चकल्या २ ते ३ दिवस कडक उन्हात वाळवाव्यात म्हणजे त्या फुलून छान दुप्पट तिप्पट मोठ्या होतात .
- चवीला खूपच स्वादिष्ट होणाऱ्या या चकल्या अजीबात तेलकट होत नाही . खुपच खुसखुशीत व कुरकुरीत होतात . - चकल्या फक्त सावलीत सुकवल्या तर त्या जास्त फुलत नाही व आतपर्यंत तळल्या जात नाही व कच्च्या राहतात .
म्हणून चकल्या उन्हात वाळवूनच नंतर डब्यात भरून ठेवाव्यात .

धन्यवाद 🙏😊

01/05/2026

तांदळाचे लाटीव पापड । पांढरेशुभ्र होणारे तिप्पट चौपट फुलणारे तांदळाचे पापड । Tandalache Papad l Tandalache Lativ Papad l Rice Papad l Papad Recipe l Rice Flour Papad l Tandalachya Pithache Papad l Papad l Valvan l Valvan Recipe l Summer Recipe l Summer Food l Papad Recipe in Marathi

साहित्य : -
- अडीच मोठ्या वाट्या पाणी
- २ मोठ्या वाट्या तांदळाचे पीठ ( अर्धा किलो )
- १ चमचा मीठ
- १ चमचा पापडखार - पाव चमचा हिंग
- १ मोठा चमचा तेल

* टिप्स : -
पापड ३ - ४ दिवस सुकवल्यानंतरच डब्यात भरून ठेवावे . वर्ष - २ वर्ष टिकतात .
तेल तळण्यासाठी भरपूर तेल घ्यावे व कडकडीत गरम करावे म्हणजे पापड तळून आकाराने तिप्पट चौपट होतात .
पापड पातळसरच लाटावे म्हणजे ते जास्त फुलतात व खुसखुशीत होतात .
तळल्यानंतर हे पापड पांढरेशुभ्र होतात व अजीबात लालसर पडत नाही .

नक्की बनवून बघा 😊
धन्यवाद 🙏

30/04/2026

रेडीमेड नाचणीच्या पीठाचे खूपच खुसखुशीत असे मसाला खिचे पापड 😋

साहित्य :-

- १ मोठी वाटी नाचणीचे रेडिमेड पीठ (२५० ग्रॅम)

- दीड वाटी पाणी

- १ फूल चमचा मीठ

- १ फूल चमचा पापडखार

- पाव चमचा हिंग

१ मोठा चमचा तेल

- १ फूल चमचा लाल तिखट

- २ मोठे चमचे तीळ

- १ चमचा जीरे (कुटून घेतलेले)

* टिप्स :-

- नाचणीचे हे मसाला पापड रेडीमेड पिठापासून बनवलेले असल्यामुळे पाण्याचं आणि पिठांचं प्रमाण अगदि परफेक्ट आहे. त्यामुळे पापड छान पातळसर होतात व तळल्यानंतर खुपच खुसखुशीत आणि स्वादिष्ट बनतात .

- अजीबात तेलाचा वापर न केल्यामुळे हे पापड वर्ष - २ वर्ष सहज टिकतात .

- हे पापड रेडिमेड पिठाचे असल्यामुळे पापडखार टाकणे खुपच महत्वाचे आहे. पापडखारमुळे पापड छान फुलतो, हलका होतो व खुसखुशीत सुद्धा होतो .

- पापड हे पातळसरच लाटावे तरच पापड दुप्पट तिप्पट फुलतो.

- खिशी घेताना सुरुवातीला पीठ मंद आचेवर ५ मिनिटे शिजते आणि पीठ एकजीव झाल्यावर मंद आचेवरच झाकण ठेवून १० मिनिटे शिजवावे म्हणजे एकूण १५ मिनिटांत पापडाचे पीठ परफेक्ट शिजते. कच्चे राहत नाही. त्यामुळे पापड एकसारखे होतात व अजीबात चिरत नाही.

- हे पापड तळल्यानंतर हलके तर होतातच पण अजीबात तेलकट होत नाही .
धन्यवाद 🙏😊

28/04/2026

तांदळाच्या पिठाचे खुपच खुसखुशीत पट्टी पापड प्रकार - २ 😊

साहित्य :-

- २ मोठ्या वाट्या (५०० ग्रॅम) तांदळाचे पीठ

- अडीच वाट्या पाणी

- १ फूल चमचा मीठ

- १ फूल चमचा पापडखार
पाव चमचा हिंग

- १ मोठा चमचा तेल

* टिप्स : -

रेशनचे तांदूळ ४ ते ५ पाण्याने स्वच्छ धुवून पाणी निथळून झाल्यावर सुती कपड्यावर पसरून पंख्याच्या हवेखाली सावलीतच ४ ते ५ तास सुकवून घ्यायचे आणि नंतर गिरणीमधून मैद्याप्रमाणे अगदि बारीक असे दळून आणायचे .

- गॅस मंद करूनच घाटा घ्यायचा व मंद आचेवरच पीठ शिजवायचं .

- पीठ कच्चे राहिल्यास पापड चिरतात व सुकताना त्याचे तुकडे पडतात .

- पापड कोणताही असो नेहमी पातळच लाटायचा म्हणजे छान फुलतो व खूपच ठिसूळ आणि खुसखुशीत होतो .

- पट्टी पापड बनवण्यासाठी आपण पिझ्झा कटर सुद्धा वापरू शकता .

- पापड तळताना तेल कडकडीतच गरम करायचं म्हणजे पापड छान फुलतो आणि हलका होतो व अजीबात तेलकट होत नाही.

- खूपच खुसखुशीत होणारे हे पापड चवीला अप्रतिम लागतात म्हणून लहान मुले तसेच सर्वचजन हे पापड आवडीने खातात. कितीही पापड खाल्ले तरी मन भरत नाही. पापडाची चव जिभेवर रेंगाळत राहते .|
धन्यवाद 🙏😊

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Megha's Kitchen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share