Mumbai Dabbawala

Mumbai Dabbawala This is MUMBAI DABBAWALA'S official page . This is our official and only page. We hope it will help us communicate with you better.

Mumbai Dabbawala are known world over for their great performance, service standards and helping Mumbaikars every single day. While you might have heard about our coding system, here you will see the human side of Mumbai Dabbawala.

26/03/2026
14/03/2026
मराठी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
27/02/2026

मराठी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

31/01/2026

स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना Dabbawala यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली
हरी ओम शांती शांती शांती
https://www.facebook.com/share/v/1AVzKK61Zn/

14/12/2025

चंद्रशेखरेंद्र सरस्वती नॅशनल इमिनेंस अवॉर्ड २०२५ सोहळा उत्साहात संपन्न

मुंबई डबेवाल्यांना ‘बेस्ट पब्लिक लीडरशिप’ पुरस्काराने गौरव

साउथ इंडियन एज्युकेशनल सोसायटी यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा चंद्रशेखरेंद्र सरस्वती नॅशनल इमिनेंस अवॉर्ड २०२५ हा मानाचा पुरस्कार सोहळा मुंबई येथे अत्यंत भव्य, आध्यात्मिक व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या सोहळ्यास आसामचे मुख्यमंत्री मा. श्री. हेमंत बिस्वा शर्मा यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य यांच्या पावन सान्निध्यामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.

कार्यक्रमाची सुरुवात गुरुवंदना, महाराष्ट्र गीत व सामूहिक वेदपठणाने झाली. वैदिक मंत्रघोषांमुळे संपूर्ण सभागृहात प्रसन्न व प्रफुल्लित वातावरण निर्माण झाले होते.

साउथ इंडियन एज्युकेशनल सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. व्ही. शंकर यांनी पुरस्कारांची घोषणा करत अखंड व अथक परिश्रम, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि उत्कृष्ट संघटन कौशल्याच्या बळावर जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवलेल्या मुंबई डबेवाल्यांना ‘बेस्ट पब्लिक लीडरशिप अवॉर्ड’ जाहीर केला.

मुंबई डबेवाल्यांच्या वतीने ट्रस्ट अध्यक्ष मा. श्री. उल्हास भाऊ मुके यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी त्यांनी या प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी निमंत्रित केल्याबद्दल तसेच सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान केल्याबद्दल साउथ इंडियन एज्युकेशनल सोसायटीचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांनाही चंद्रशेखरेंद्र सरस्वती नॅशनल इमिनेंस अवॉर्ड प्रदान करून गौरविण्यात आले.
यामध्ये —
डॉ. प्रल्हाद रामाराव (ऑटो स्पेस टेक्नॉलॉजी व सायन्स टेक्नॉलॉजी),
पद्मविभूषण डॉ. शिवथनू पिल्लई (सायन्स अँड टेक्नॉलॉजी),
डॉ. मनी द्रविड (संस्कृत प्राध्यापक)
या उत्तुंग कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा समावेश होता.

मुंबई डबेवाल्यांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर झालेली ही गौरवपूर्ण दखल असून, या सन्मानामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. शिस्त, वेळेचे अचूक नियोजन आणि निस्वार्थ सेवेचे प्रतीक असलेल्या मुंबई डबेवाल्यांचा हा गौरव संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरला आहे.

27/11/2025

मुंबई डबेवाल्यांच्या संस्थापकांच्या स्मारक भूमिपूजनाचा सोहळा उत्साहात पार

मुंबई डबेवाल्यांच्या शिस्तबद्ध, समयनिष्ठ आणि पर्यावरणपूरक कार्यसंस्कृतीला आधुनिक व्यवस्थापनाची नवी चौकट देणारे आद्य मार्गदर्शक स्व. महादू हावजी बच्चे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जन्मगावी उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

शतकीय परंपरेचा वारसा जपणारी मुंबई डबेवाला सेवा आज जगभर Zero Error Service म्हणून ओळखली जाते. महादू हावजी बच्चे यांनी स्थापन केलेल्या ‘मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळ’ आणि ‘नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून डबेवाल्यांची सेवा संघटनशक्ती, शिस्त, सामूहिक जबाबदारी आणि समाजाभिमुख उपक्रमांच्या आधारे आदर्श व्यवस्थेत विकसित झाली आहे.
धर्मशाळा, अन्नछत्र, रोटी बँक, पर्यावरण उपक्रम आणि सामाजिक बांधिलकीची सातत्याने जोपासना केल्याबद्दल डबेवाल्यांच्या कार्याचे विशेष कौतुक या प्रसंगी करण्यात आले.

डबेवाल्यांच्या अद्वितीय कार्यपद्धतीला आजवर ७०० हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार, तसेच प्रिन्स चार्ल्स आणि रिचर्ड ब्रॅन्सन यांसारख्या जागतिक नेत्यांची प्रत्यक्ष दखल मिळाली असून, त्यांच्या सेवेची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक दृढ झाली आहे.

या स्मारक भूमिपूजन सोहळ्यास आमदार श्रीकांत भारतीय, आमदार बाबाजी शेठ काळे, जि.प. सदस्य अतुल भाऊ देशमुख, जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद बुट्टे पाटील, इंजि. दिलीप शेठ मेदगे, माजी संचालक कात्रज दूध संघ शेखर भाऊ शेटे, संचालक अरुण शेठ चांभारे, माजी जि.प. सदस्य जयसिंग शेठ भोगाडे, भोसरीचे माजी नगरसेवक रवी भाऊ लांडगे, उद्योगपती किरण शेठ मुके, मुंबई डबेवाला संघटना अध्यक्ष उल्हास मुके, मंडळ अध्यक्ष रामदास करवंदे, तसेच अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील विविध पदाधिकारी, सरपंच, चेअरमन आणि तालुक्यातील जनतेच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा अधिक भव्य, ऐतिहासिक आणि अविस्मरणीय ठरला.

पारंपरिक ढोल-ताशे, लेझीम आणि दिंडीच्या गजरात पार पडलेला हा कार्यक्रम डबेवाल्यांच्या सेवाभाव, सांस्कृतिक परंपरा आणि महादू हावजी बच्च्यांच्या प्रेरणादायी कार्याची जिवंत साक्ष ठरला. प्रस्तावित स्मारक पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थळ ठरेल, अशी सर्वमान्य भावना व्यक्त करण्यात आली.

यावेळी भाषण करताना आमदार श्री श्रीकांतजी भारतीय म्हणाले की,
“हे स्मारक केवळ प्रेक्षणीय स्थळ न राहता प्रार्थनेचे आणि श्रध्येचे स्थान व्हावे. डबेवाल्यांच्या या पवित्र वास्तूच्या उभारणीत सर्वांनी यथोचित सहाय्य करावे. तसेच डबेवाल्यांच्या घरांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते पार पाडण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”

या आशावादी घोषणेने सोहळ्याला एक विशेष ऊर्जायुक्त दिशा मिळाली. कार्यक्रमाचे संचलन आणि आभारप्रदर्शन डबेवाल्यांच्या सेक्रेटरी श्री.किरण गवांदे यांनी केले.

06/11/2025

ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांच्या मुलीच्या साखरपुड्याबद्दल मुंबई डबावाला संघटनेच्या वतीने कुठलेही कमेंट केली गेलेली नाही ज्याने कुणी कमेंट सोशल मीडिया व प्रिंट मीडियामध्ये केली यांचा आणि मुंबई डबावाला संघटनेच्या कुठलाही काहीही संबंध नाही

मुंबई डबावाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रMumbai Dabbawala International Experience Center Mumbai  Rijavi College Bandra (...
01/11/2025

मुंबई डबावाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र
Mumbai Dabbawala International Experience Center
Mumbai Rijavi College Bandra (W)

18/09/2025
31/08/2025

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mumbai Dabbawala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mumbai Dabbawala:

Share