SS Kitchen's

SS Kitchen's I Love Cooking...��
I Like To Share Cooking Recipes To People..�
"Kitchen Magic Happens Here"..�

20/03/2025

coffee🥤

कोल्ड कॉफी

साहित्य :
दुध - दोन कप
वॅनिला आईसक्रीम - तीन चमचे
साखर - आवशक्तेनुसार
कॉफी पावडर - एक चमचा
बर्फ - आवशक्तेनुसार
चॉकलेटे सिरप - आवशक्तेनुसार
चॉकलेट बार - आवशक्तेनुसार

कृती :
आधी मिक्सर च्या भांड्यात बर्फ, कॉफी पावडर आणि साखर टाकून फिरवून घ्या नंतर या मिश्रणात दुध आणि वॅनिला आईसक्रीम टाका व परत फिरवून घ्या. रिकाम्या काचेच्या ग्लास मधील आतल्या बाजूमध्ये आधी चॉकलेट सिरप नंतर तयार मिश्रण टाकून वरून किसलेला चॉकलेट बार व चॉकलेट सिरप टाका आणि थंडगार कोल्ड कॉफी सर्व्ह करा

https://www.instagram.com/reel/DHbT-znNUp6/?igsh=anhpOWk3cXo5NWtv

https://youtube.com/shorts/qa6jkcpJnB0?si=ohLjxAchWS2FBple

13/03/2025

🔥

पुरणपोळी

साहित्य :
हरभरा डाळ - दोन वाट्या
गुळ - दोन वाट्या
वेलची पावडर - दोन चमचे
सुंठ पावडर - अर्धा चमचा
जायफळ पावडर - अर्धा चमचा
साजूक तूप - आवश्यकतेनुसार
गव्हाचे पीठ - दोन वाट्या
पाणी - आवश्यकतेनुसार
तेल - आवश्यकतेनुसार
मीठ - आवश्यकतेनुसार
हळद - आवश्यकतेनुसार (ऐच्छिक)

कृती :
सर्वप्रथम हरभरा डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. एका पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवून त्यात दोन चमचे तेल टाकून नंतर त्यामध्ये हरभरा डाळ टाकून ती छान शिजवून घ्या. डाळ शिजवून झाल्यावर त्यातले पाणी पूर्णपणे काढून त्यामध्ये गुळ, वेलची पावडर, सुंठ पावडर, जायफळ पावडर व साजूक तुप टाकून हे मिश्रण परतून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर ते मिक्सर मध्ये वाटून पुरण तयार करून घ्या. गव्हाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ, रंग येण्यासाठी आवडीनुसार हळद तसेच आवश्यकतेनुसार पाणी टाकून पिठाचा घट्टसर गोळा मळून घ्या. नंतर त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून पीठ चांगल्या प्रकारे तिंबून घ्या व अर्धा ताससाठी झाकून ठेवा. अर्ध्या तासानंतर मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करून त्यात पुरण भरून पुरणपोळ्या लाटून घ्या व गरम पोळीवर साजूक तूप टाकून सर्व्ह करा

https://youtube.com/shorts/y98IjDMPgzA?si=iCx0IH8RQbRIXEXF

https://www.instagram.com/reel/DHJeyYStkSk/?igsh=NTNsNDdsaDZib3lu

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SS Kitchen's posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category