16/03/2026
सांगलीत ‘लाडाची कुल्फी’चा गोडवा वाढला; नामदार जयंत पाटील साहेबांनी लुटला कुल्फीचा आस्वाद!
सांगली: आपल्या कामाच्या व्यस्त व्यापातून वेळ काढत, जनमाणसात मिसळणारे लोकनेते नामदार जयंत पाटील साहेब यांनी नुकतीच सांगली येथील ‘लाडाची कुल्फी’ (Ladachi Kulfi) या शाखेला अचानक भेट दिली. साहेबांच्या या अनपेक्षित भेटीमुळे शाखेचे मालक आणि उपस्थित ग्राहक भारावून गेले होते.
ब्रँडची घेतली सविस्तर माहिती
या भेटीदरम्यान जयंत पाटील साहेबांनी केवळ कुल्फीचा आस्वादच घेतला नाही, तर या मराठमोळ्या ब्रँडबद्दल विशेष कुतूहलही दाखवले. त्यांनी फ्रेंचायझी मालकांशी अतिशय दिलखुलास गप्पा मारल्या. व्यवसायाचे स्वरूप, कुल्फीचे विविध प्रकार आणि ‘लाडाची कुल्फी’ या ब्रँडचा विस्तार याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. एका मराठी तरुणाने उभा केलेला हा व्यवसाय पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
“खूप छान क्वालिटी आहे बग...”
आपल्या खास सांगली स्टाईल शैलीत संवाद साधत साहेबांनी स्वतः लाडाची कुल्फी खाल्ली. कुल्फीची चव आणि दर्जा पाहून त्यांनी “खूप छान क्वालिटी आहे बग!” अशा शब्दांत कौतुक केले. साहेबांच्या या एका वाक्याने आणि शाबासकीच्या थापेने मालकांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.
व्यवसायाला दिल्या शुभेच्छा
अस्सल चव आणि शुद्धता जपणाऱ्या या ब्रँडला साहेबांनी भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. “सामान्य माणसाला परवडेल अशा दरात दर्जेदार उत्पादन देणे हीच व्यवसायाची खरी यशाची गुरुकिल्ली आहे,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.