Bhojan Kutuhalam

Website

Bhojan Kutuhalam Journey 'Back To The Roots' - Where Culinary Traditions Meet the Ayurveda

12/09/2026

लाल भोपळ्याची भाजी (उपवास विशेष)

साहित्य -
पाव किलो स्वच्छ धुवून चिरलेला लाल भोपळा
अर्धी वाटी सुकं खोबरं
१-२ हिरव्या मिरच्या
आल्याचा तुकडा
अर्धा चमचा तेल
चमचाभर तूप
जिरं
चिंचेचा कोळ
लाल तिखट
चवीनुसार मीठ
सजावटीला कोथिंबीर

कृती :
१. किंचित तेलात खोबरं, हिरवी मिरची, आलं खरपूस परतून घ्या. व गार झाल्यावर वाटण करून घ्या
2. तुपात जिर फुलवून तयार वाटण घाला, मंद आचेवर परतून घ्या.
3. चवीनुसार मीठ, तिखट, चिंचेचा कोळ व चिरलेला लाल भोपळा घाला. गरजेनुसार पाणी घाला.
4. ५ मिनिटे वाफेवर भाजी शिजवून घ्या.

Recipe - Devika Joshi Gokhale
Ayurvedic expert - Dr. Yogesh Vaishampayan

04/09/2026

भरली केळी!

गोकुळाष्टमीला नैवेद्य दाखवण्यासाठी केला जाणारा गोडाचा पदार्थ!

साहित्य -
३-४ राजेळी केळी
१ वाटी ओलं खोबरं
अर्धी वाटी गूळ
चमचाभर साखर
वेलची पूड चवीनुसार
जायफळ पूड चवीनुसार
साजूक तूप
अर्धी वाटी नारळाचं दूध

कृती -
1. ओलं खोबरं व गूळ एकत्र करून ५ मिनिटं बाजूला ठेऊन द्या.
2. नंतर पातेल्यात तयार मिश्रण मंद आचेवर परतून घ्या. थोडं साजूक तूप, वेलची पूड, जायफळ पूड घाला.
3. गूळ व्यवस्थित विरघळला की थोडं ओलसर असतानाच गॅस बंद करा व हे मिश्रण गार करून घ्या.
4. केळी सोलून, मधोमध चीर पाडून गार मिश्रण त्यात घट्ट दाबून भरा.
5. ही केळी साजूक तुपावर छान परता, नारळाचं दूध घालून एक वाफ आणा.
6. केळी शिजली, की मस्त ताव मारा.

तुमचं पातेलं जाड बुडाचं नसेल, तर केळी शिजवताना आधी साल ठेवा.

27/08/2026

Comment if you have any such recipes!

21/08/2026

हरभऱ्याचं कढण!

साहित्य :
१ कप हरभरे
५ कप पाणी
१/२ कप गोड दह्याचे ताक
१ चमचा साखर
मीठ चवीप्रमाणे
१/४ टीस्पून जिरे
१/४ टीस्पून हिंग
५-६ कढीपत्ता पाने
२ हिरव्या मिरच्या
१/४ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
फोडणीसाठी १ टेबलस्पून तूप / तेल

कृती :
१. हरभरे ८-१० तास भिजवून ठेवा. भिजवलेले हरभरे चाळणीत झाकून उबदार जागी ठेवा. म्हणजे त्याला मोड येतील.
२. मोड आलेले हरभरे कुकरमध्ये ५-६ कप पाणी घालून ४-५ शिट्ट्या काढून मऊसर शिजवून घ्या.
३. कढणासाठी वरचे पाणी ओतून घ्या. हरभरे नंतर उसळीसाठी ठेऊन द्या.
४. फोडणीच्या कढईत तूप गरम करून आधी जिरे मग हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. मिरची पांढरी झाली कि मग कढीपत्ता आणि हिंग घालून कढणाला फोडणी द्या.
५. हरभऱ्याच्या पाण्यात मीठ, साखर, कोथिंबीर घालून उकळा. उकळी आल्यावर गॅस बंद करा आणि मग २-३ मिनिटांनी ताक घाला.

टीप : कोणत्याही कड धान्याचे कढण हे अतिशय पौष्टिक असते. आजारी माणसाला तोंडाला चव येण्यासाठी आवर्जून करावे.

In frame - Shubhangi Joshi, Devika Joshi- Gokhale
Ayurvedic Expert - Dr. Yogesh Vaishampayan
Video shoot, Edit - Saurabh Surve



(Harabhara, shravan, shravan recipe, food, food reel)

16/08/2026

कुळथाच्या पाटवड्या

साहित्य:
१ वाटी कुळथाचे पीठ
१ चमचा तांदूळ पीठी
७/८ लसूण पाकळ्या ठेचून
मीठ
तिखट
कढीलिंब
तेल

कृती:
१. पहिल्यांदा पीठात पाणी घालून सरसरीत भिजवा, त्यात मीठ, मिरची (कुटून) घाला. (आवडत असल्यास)
२. कढईत तेल घ्या,चरचरीत फोडणी करा, लसूण व कढीलिंब चांगला खमंग परता.
३. आता तयार मिश्रण त्यात मिसळा व चांगली दणकून वाफ आणा.
ताटलीला तेल लावून ठेवा, मिश्रण त्यावर ओतून थापा, जरा गार झाले, कीवडी पाडून घ्या. वरून खोबरे व कोथिंबीर भूरभूरा.

(हरभरा डाळ पचायला जड असते, म्हणून ती कुळथाची पाटवाडी करू शकतो.बाळंतीणीला व आजारी माणसाला पण चालते)

Recipe and in frame : Shubhangi Joshi, Devika Joshi - Gokhale
Ayurvedic Expert : Dr. Yogesh Vaishampayan
Video Shoot, Edit : Saurabh Surve

(Kulith, horsegram, kulith patwadi, Patwadi rassa, Recipe, Indian traditional recipe)

तुमच्याकडे श्रावणात कोणते वेगळे पदार्थ केले जातात? Comment please(Shravan, shravan month, food, traditional food, scienc...
10/08/2026

तुमच्याकडे श्रावणात कोणते वेगळे पदार्थ केले जातात? Comment please

(Shravan, shravan month, food, traditional food, science behind food)

31/07/2026

Ginger Halwa आल्याचा हलवा.
साहित्य
१=वाटी भरून आल्याचा कीस
२= वाट्या कणिक
१= वाटी तूप
१=वाटी बारीक केलेला गूळ
३/४ खजूर ( किसायचा नाही फक्त बारीक तुकडे करायचे )
२= चमचे भरून सूंठ
१= चमचा वेलची पूड
१= वाटीत मावेल येवढा सूका मेवा ( तुमच्या इच्छे नुसार बदाम,काजू,बेदाणे, पिस्ता)

कृती
१= पॅन मधे२ चमचे तूप घ्या व आल्याचा किस त्यावर गुलबट परतून घ्यायचा.मग परत ३ते ४ चमचे तूप घाला व कणीक व आलं बरोबरीनेच खमंग भाजायचे . कणकेचा रंग बदलला पाहिजे व घरभर खमंग वास दरवळला पाहिजे.
२= एका पातेलीत गूळ व पाणी घालून पातेलं गॅसवर ठेवा . साधारण ४ते ५ वाट्या पाणी गुळात घाला . गूळ विरघळून एक कढ आणा.
३= भाजलेल्या कणकेत खजूर घालून उरलेले तूप सोडा व परत सगळे मिश्रण परता.
४= आता गुळाचे पाणी मिश्रणावर घालायचे व एकसारखे चमच्याने फिरवत राहायचे. म्हणजे गुठळी होणारं नाही.
५= पाचच मिनीटांत हलवा आळून येईल मग लगेचच सूंठ पावडर व वेलची पूड घालायच.
एकच वाफ आणायची हलव्याला. आणि गरम गरम खायचं.

In frame - Shubhangi Joshi, Devika Joshi - Gokhale
Ayurvedic Expert - Dr. Yogesh Vaishampayan
Video shoot, Edit - Saurabh Surve

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhojan Kutuhalam posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share