daly life

daly life Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from daly life, Grocers, Pune.

शुभ सकाळ 🙏🙏🙏🙏
23/08/2026

शुभ सकाळ 🙏🙏🙏🙏

11/08/2026
पुन्हा एकदा एका अस्मितेचा बळी गेला आहे. कोल्हापूर मधली  अस्मिता प्रतीकसिंह काटकर या विवाहितेने मुलगी एक महिन्याची असतान ...
17/07/2026

पुन्हा एकदा एका अस्मितेचा बळी गेला आहे. कोल्हापूर मधली अस्मिता प्रतीकसिंह काटकर या विवाहितेने मुलगी एक महिन्याची असतान गळफास लावून आत्महत्या केली आहे. तिच्या आईने सासरच्या मंडळीवर आरोप करताना एक स्टेटमेंट केले. तिची आई बोलली मुलीसाठी 52 हजाराचा पाळणा मागितला होता. अस्मिता च्या आईने 40 हजार रुपये दिले होते आणि बाकीचे पैसे बारशाच्या दिवशी देणार होते.

हे एकच वाक्य किती बोलकं आहे त्या आईचं!! 52 हजाराचा पाळणा? मुलगी झाली होती म्हणून सासरचे लोक अतिशय टोमणे मारत होते. मुलगा होईल या दृष्टीने सासरच्या लोकांनी कपड्यांची खरेदी केली होती परंतु मुलगी झाल्यामुळे त्यांचा अतिशय हिरमोड आणि अपेक्षाभंग झाला! 😑 शिवाय लग्नामध्ये अस्मिताला डान्स करायला सांगितला तेव्हा तिने केला नाही त्याच्यामुळे सासूची "अस्मिता" दुखावली गेली होती आणि सासू त्याच्यावरून तिला सतत बोलायची हे अस्मिताने आपल्या आईला सांगितले होते.

वाचताना असं वाटू शकते की कदाचित मुलीची आई आता मुलगी गेल्यावर खोटं बोलत आहे का काय?? परंतु अस्मिता च्या आईवर वकील म्हणून विश्वास ठेवावा अशी एकापेक्षा एक प्रकरणे मी बघितलेली आहेत. जिथे माझ्या बहिणी बरोबर त्या दिवशी गाडीत बसल्यावर बोलली नाहीस, माझ्या आईकडे तू रागानेच बघितले, माझ्या मावशीच्या मावस सासूच्या मामाच्या मुलाच्या लग्नात तुला गाणं म्हणायला सांगितलं होतं तू म्हटलं नाही ?!🥴 दे आता घटस्फोट! जा माहेरी असल्या पाद्रट कारणांवरून मुली माहेरी आणून सोडलेल्या आहेत. मुलगी आणि आईबाप हातपाय जोडून बेजार परंतु जा आता घटस्फोटच पाहिजे म्हणून आडून बसलेले आणि दुसरी मुलगी सहज मिळेल अशा गर्वात बसलेले टोणगे आणि त्यांचे आईबाप अगदी समोरची उदाहरणे आहेत.

अस्मिता च्या आईने बाकीचे जे गंभीर आरोप केले आहे त्याच्यामध्ये तिचे असे म्हणणे आहे की , "अस्मिताचा सतत पैशावरून छळ व्हायचा, तिने डोक्यावरचा पदर ढळू द्यायला नाही पाहिजे, सासूला मांसाहेब बोलायचं, नणंदेला राणीसाहेब बोलायचं, नवऱ्याला सरकार म्हणूनच हाक मारली पाहिजे आणि सासऱ्यांना आबासाहेबच म्हटलं पाहिजे" अशा तिला सूचना केल्या जायच्या." अस्मिताच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. नवरा सासू-सासरे ननंद सध्या कस्टडीमध्ये आहेत.

फक्त मला एक गोष्ट कळत नाही की मुलीच्या आई-वडिलांना मुलगी गेल्यानंतरच का बरं बोलण्यासाठी कंठ फुटतो? घेऊन यायचं होतं मुलीला माहेरी तिला बाळंतीण झाल्यानंतर पाठवायचं नव्हतं. जेव्हा घरामध्ये असे वितंड वाद चालू असतील तेव्हा शक्यतो लवकर मूल जन्माला घालायचा विचार केला नाही पाहिजे. अवघ्या एक महिन्याची मुलगी आपल्या आई पासून अक्षरश: तुटली. सासरचा मानसिक आणि शारीरिक छळ सोसतही नाही पण आपण आपल्या आई-वडिलांच्या घरी जर राहायला आलो तर त्यांचं समाजामध्ये नाक कापले जाईल या विचाराने जर अस्मिताने आत्महत्या केली असेल तर ते अतिशय दुर्दैवी आहे!🙏🏿❤️‍🩹
- अंजली झरकर

दारु पिऊन मृत झालेल्या नवऱ्याला त्याच्या विधवा पत्नीने लिहीलेलं पत्र. काल तुझा अकाली मृत्यू झाला. आयुष्यात स्थिरस्थावर ह...
15/07/2026

दारु पिऊन मृत झालेल्या नवऱ्याला त्याच्या विधवा पत्नीने लिहीलेलं पत्र.

काल तुझा अकाली मृत्यू झाला. आयुष्यात स्थिरस्थावर होऊन आनंद उपभोगण्याचे, मुलांबरोबर फिरण्याचे, खेळण्याचे, बायकोबरोबर गप्पागोष्टी, थट्टामस्करी करण्याचे तुझे वय.
परंतु त्या सुखाला तू कायमचा मुक लास. मात्र तुझ्या मृत्युमुळे या आनंदाला तुझी मुलं देखील पोरकी झाली. तुझी बायकोही मुकली या सुखाला अन् पती सुखालाही. काय कारण होतं या सगळ्याचं? तू खोट्या आनंदात रममाण झाला होतास.

त्यामुळे खऱ्या आनंदाला तू मुकतोस याचे तुला भानच राहिले नव्हते.

लग्न झाल्यापासून पाहतेय, तू कायम मित्रांच्याच गराड्यात cheers करत असायचास. मित्र असावेतच, पण आपलं कुटुंब सुद्धा आहे, त्याबद्दल आपली जबाबदारी सुद्धा आहे. याचा तुला विसर पडला होता.

शिवाय रोज रात्री बाटली घेऊन घरी बसणे 🍷होतेच. त्यामुळे आपल्या मुलांवर काय परिणाम होतो याची तू चिंताच करत नव्हतास. रोज रात्री 9 नंतर बाबा आपले नाहीत याची त्यांना जणू सवय लागली होती, पण तुझी भीतीही वाटत होती. बायकोवर हात उगारणे, भांडणे हे त्यांच्यासाठी नित्याचेच झाले होते. आपली मुलं कितवीत आहेत, त्यांना काय हवे, काय नको, याची तुला परवाच नव्हती. तू आणि तुझे मित्र.

दारू ही औषधी आहे, हृदयविकार दूर ठेवते वगैरे पेपर मधली माहिती तू दाखावायाचास, परंतु त्याच दारूमुळे आपल्यातलाच दुरावा वाढलेला तुला समजलाच नाही किंवा समजून घेण्याची तुझी इच्छाच नव्हती. जर ही बाटली एवढा आनंद देणारी, औषधी असेल तर ती मी आणि मुलांनी घेतली तर तुला चालली असती का?
अधूनमधून तुला प्रेमाचे भरते यायचे व तू दारू सोडायचे ठरवायाचास, परंतु परत मित्रच आडवे यायचे. कुठल्या तरी आनंदात किंवा कोणाच्या तरी दु:खात तू परत त्यांच्या बरोबर बसायचास, की मग पुन्हा सर्व सुरु. मित्राला परत परत दु:खात लोटणारे असले कसले रे हे मित्र? जीवनात आनंद मिळवण्याचे अनेक चांगले मार्ग आहेत. परंतु तुम्ही सर्वांनी मात्र वाईट मार्गच निवडला. दारू पिणं सोडून बघितलं असतंस तर यातले अर्ध्याहून अधिक मित्र गायब झाले असते.

तुझी आजारपणे चालू झाली आणि घराची आर्थिक विवंचना अजूनच वाढली. तुझ्या पोटात झालेले पाणी काढणे, लिवरची सूज उतरवायला औषधे घेणे, हे सोपस्कार चालू झाले. माझ्या सुद्धा ऑफिसला दांड्या चालू झाल्या. हौसमौज करणे दूरच, मुलांची फी सुद्धा वेळेवर भरली जात नव्हती.

तुझ्या शेवटच्या आजाराने तर डोक्यावर कर्ज करून ठेवले. तू बरा होणार नाहीस माहित असून सुद्धा तुझ्या औषधोपचाराचा खर्च थांबवला नाही आम्ही.

सरकारला सुद्धा दारूबंदी नको आहे. कारण त्यांचे फक्त मिळणाऱ्या महसूलाकडेच लक्ष आहे. पण माणसाची काम करण्याची ताकद कमी होणे, आजारपण वाढणे यामुळे होणारे नुकसान सरकारला दिसत नाही का? शिवाय नवरा/मुलगा/वडील गमावणे याची किंमत पैश्यात कशी मोजणार आहे हे सरकार?

आता तुझ्या आई वडिलांची सेवा, मुलांचे शिक्षण व संस्कार हे सर्व माझी एकटीची जबाबदारी झाली आहे. ती मी पार पाडीनच पण महत्वाचे म्हणजे माझ्या मुलांना या *‘एकच प्याला’* पासून दूर ठेवणे माझ्या दृष्टीने फार महत्वाचे आहे.

पुढच्या जन्मात मला तूच नवरा म्हणून हवा आहेस, परंतु तुझ्या हातात ग्लास नसेल तरच...

*तुझीच प्रिय अर्धांगी*
*X.Y.Z
विचार करण्यासारखी गोष्ट...
खरच दारू वाईटच असते मग ती कितीही महाग असुद्या...
एन्जॉय करा पण आपलंच आयुष्य बरबाद करून नाही
आपलं तर होताच पण सोबत आपल्या फॅमिली च पण आयुष्य आपण बरबाद करतो.
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि या सरख्या गोष्टींवर खरच विचार करा.
💐💐💐💐💐

कोणी लिहिले माहिती नाही परंतु फार छान आहे प्रेरणादायक होते म्हणून आपणास शेअर केले शेअर कले
फोटो- प्रातिनिधिक

💔 क्षणिक मोह... पण उद्ध्वस्त होणारं संपूर्ण आयुष्य! 💔आजकाल संसार मोडण्यामागचं कारण नेहमीच नवरा-बायकोमधील भांडण नसतं...कध...
04/07/2026

💔 क्षणिक मोह... पण उद्ध्वस्त होणारं संपूर्ण आयुष्य! 💔

आजकाल संसार मोडण्यामागचं कारण नेहमीच नवरा-बायकोमधील भांडण नसतं...
कधी कधी एखादी तिसरी व्यक्ती अतिशय गोड बोलत तुमच्या आयुष्यात प्रवेश करते.
"तुला कोणी समजून घेत नाही..." "तू खूप चांगला/चांगली आहेस..." "तू आधी भेटला/भेटली असतास तर..."
हे शब्द ऐकायला खूप प्रेमळ वाटतात... पण प्रत्येक गोड शब्दामागे प्रेमच असतं असं नाही.
काही लोक स्वतःला दुःखी, एकटे आणि बिचारे असल्याचं दाखवतात... तुमचा विश्वास जिंकतात... तुमच्या संसारातील अडचणी जाणून घेतात... आणि नकळत तुमच्या नात्यात संशय, गैरसमज आणि दुरावा निर्माण करतात.
सुरुवात फक्त मैत्रीपासून होते... मग मेसेज... फोन... रोजचं बोलणं... भावनिक आधार... मग कधीतरी फोनचा रिचार्ज... कधी गिफ्ट आणि एका क्षणी आपल्यालाच कळत नाही की आपण आपल्या माणसापासून किती दूर आलो आहोत.
एक्स्ट्रा मेरीटल अफेअर म्हणजे प्रेम नाही... तो एका व्यक्तीच्या विश्वासाचा, एका कुटुंबाच्या आनंदाचा आणि अनेक निरागस स्वप्नांचा विश्वासघात असतो.
क्षणभराच्या आकर्षणासाठी... काही गोड शब्दांसाठी... काही भेटवस्तूंसाठी... किंवा खोट्या सहानुभूतीसाठी...
खरंच इतक्या जणांच्या आयुष्याशी खेळणं योग्य आहे का?
एक्स्ट्रा मेरीटल अफेअर करण्यापूर्वी फक्त एकदा स्वतःला हा प्रश्न विचारा...
"माझ्या मागे किती जणांचं आयुष्य माझ्यावर अवलंबून आहे?"
माझ्या एका चुकीमुळे...
💔 माझ्या जोडीदाराचा विश्वास कायमचा तुटेल... 👶 माझ्या मुलांचं बालपण उद्ध्वस्त होईल... 👵 आई-वडिलांच्या डोळ्यांतील अभिमान अश्रूंमध्ये बदलेल... 🏠 वर्षानुवर्षे प्रेमाने उभा केलेला संसार एका क्षणात कोसळेल.
त्या एका चुकीची शिक्षा फक्त तुम्हाला मिळत नाही... ती तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मिळते.
सगळ्यात मोठी शोकांतिका म्हणजे... विश्वासघात करणाऱ्याला कदाचित काही दिवसांचं सुख मिळेल...
पण ज्याचा विश्वास तुटतो... तो माणूस आयुष्यभर प्रत्येक नात्याकडे संशयाने पाहू लागतो.
लक्षात ठेवा...
जे लोक तुम्हाला तुमच्या जोडीदारापासून दूर नेतात... तुमच्या संसारात फूट पाडतात... आणि तुमच्या नात्यापेक्षा स्वतःला महत्त्वाचं ठरवतात...
ते तुमच्यावर प्रेम करत नाहीत... ते त्यांच्या स्वार्थासाठी तुमच्या आयुष्याशी खेळत असतात.
नात्यात अडचणी असतील... तर संवाद साधा... एकमेकांना समजून घ्या... गरज पडली तर सन्मानाने वेगळं व्हा...
पण कोणाच्याही विश्वासाचा खून करून स्वतःचं सुख शोधू नका.
कारण...
क्षणिक मोह संपतो... गोड शब्द बदलतात... आकर्षण ओसरतं... गिफ्ट्स संपतात...
पण...
तुटलेला विश्वास, रडणारी मुलं, उद्ध्वस्त झालेलं कुटुंब आणि जखमी झालेली मनं... आयुष्यभर त्या वेदना विसरू शकत नाहीत.
🙏 शेवटी फक्त एकच...
संसार उभा करायला अनेक वर्षं लागतात... पण तो मोडायला फक्त एक चुकीचा निर्णय पुरेसा असतो.

म्हणुच संसार हा चिकाटीने आणि मनापासुन करा हमकास पुढे जाल.कोणाच्या आधाराची गरज पडणार नाही कोणी कोणाच नसतं.

म्हणून क्षणिक मोहापेक्षा आपल्या जोडीदारावर, आपल्या मुलांवर, आपल्या कुटुंबावर आणि आपल्या जबाबदाऱ्यांवर प्रेम करा. कारण प्रेमाचं खरं सौंदर्य दुसऱ्याचं घर मोडण्यात नाही... तर ज्याने तुमच्यावर जीवापाड विश्वास ठेवला आहे, त्या विश्वासाचं शेवटच्या श्वासापर्यंत रक्षण करण्यात आहे. ❤️🥺🙏

#एकनिर्णयपणपुरेसामोडायलाकरा #एकचफक्तगोडनसतंपण
#जखमीएकचरडणारीवेदणाझालेलनाहीत #संसारचिकाठीने

आयुष्य म्हणजे एक टास्क
04/07/2026

आयुष्य म्हणजे एक टास्क

Shree Swami Samarth 🙏🙏🌹
17/06/2026

Shree Swami Samarth 🙏🙏🌹

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when daly life posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category