16/08/2026
शेतकरी म्हणून शेती करायची की व्यवसायिकासारखी शेती चालवायची?
कुठलाही बिझनेसमन एखादा प्रॉडक्ट सुरू करतो आणि तो प्रॉफिटेबल करायचा असतो, तेव्हा त्याच्या डोक्यात काही बेसिक प्रश्न असतात.
Production Cost कशी कमी करता येईल?
Output Quality कशी वाढवता येईल?
Product मध्ये Value Addition कशी करता येईल?
Sales कशा वाढवता येतील?
आणि शेवटी Margin आणि Profit कसा वाढवता येईल?
मला नेहमी प्रश्न पडतो—हेच साधं गणित शेतकऱ्याला शेतीमध्ये का लागू करता येत नाही?
AllGanic Farm मध्ये आम्ही सुरुवातच Input Cost कमी करण्यापासून केली.
हजारो रुपये खर्च करून युरिया, DAP आणि बाहेरची खते विकत घेण्याऐवजी शेतात उपलब्ध कचऱ्यापासून खत तयार करता येतं, हे आम्ही फक्त सांगितलेलं नाही; करून दाखवलं आहे.
कचऱ्यापासून खत, BSFL, कंपोस्ट, बायोचार अशा अनेक पद्धती वापरल्या. जवळपास 49 प्रकारची पिकं घेऊन त्या पद्धतींचा प्रत्यक्ष वापर केला. यावर शेकडो नाही तर हजारो व्हिडिओ केले.
तरीही प्रश्न तोच आहे—शेतकरी आपली Input Cost कमी करण्याचा विचार किती करतो?
दुसरा सर्वात महत्त्वाचा Input म्हणजे पाणी.
पाणी वाचवायचं असेल तर फक्त “पाणी कमी वापरा” म्हणून उपयोग नाही. मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवावी लागते. त्यासाठी आम्ही शेतात अनेक प्रयोग केले. पाणी जमिनीत जास्त काळ कसं टिकेल, मातीमध्ये ओलावा कसा राहील, यावर काम केलं.
तिसरा मोठा खर्च म्हणजे Labour.
म्हणूनच कमी जागेत जास्त मूल्याचं उत्पादन कसं घ्यायचं, Square Foot Farming कशी करायची, एका बेडमध्ये सहा प्रकारची पिकं कशी घेता येतात—हेही आम्ही प्रत्यक्ष करून दाखवलं.
पण व्यवसाय फक्त खर्च कमी करण्यावर चालत नाही.
Product मध्ये uniqueness आणि value additionसुद्धा लागते.
सगळ्या शेतकऱ्यांना आपल्या दुधाला ₹120 मिळावं असं वाटतं.
पण स्वतःला एक प्रश्न विचारा—तुमचं दूध बाकी हजारो शेतकऱ्यांच्या दुधापेक्षा वेगळं का आहे?
AllGanic Farm मध्ये आमच्या गाईंच्या पोषणावर विशेष भर आहे. आमच्या दुधाला साधारण 6% पर्यंत फॅट मिळू शकतं. दुधाची जाड साय हा त्याचा एक स्पष्ट फरक आहे. गाईंच्या आहारात 16 प्रकारच्या वनस्पतींचा समावेश करतो. देशी गाईंचं संगोपन करतो.
तिथेच थांबत नाही.
दूध पॅक करून, सील करून घरपोच देतो. आणि त्याच दुधाचं पनीर, तूप, ताक अशा उत्पादनांमध्ये Value Addition करतो.
म्हणजे फक्त “दूध विकायचं” नाही.
दुधापासून जास्त मूल्य निर्माण करायचं.
अंड्यांमध्येही आम्ही हाच विचार केला.
कचऱ्यापासून BSFL तयार केली. त्यातून कोंबड्यांसाठी खाद्याचा एक स्रोत तयार झाला आणि त्याच प्रक्रियेत frass म्हणजे खतही मिळालं.
म्हणजे कचरा फेकून देण्याऐवजी—
कचरा → BSFL → कोंबडीचं खाद्य → अंडी + खत
अशी सर्क्युलर सिस्टीम तयार केली.
यानंतर अंड्यांच्या गुणवत्तेवरही काम केलं. आमच्या उपलब्ध लॅब टेस्टनुसार, बाजारातील नमुन्यांच्या तुलनेत आमच्या अंड्यांमध्ये प्रोटीन, पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम आणि Omega-3 मध्ये फरक आढळला.
म्हणजे उत्पादन फक्त तयार करायचं नाही.
त्याची Quality आणि Valueसुद्धा वाढवायची.
आणि शेवटी येतो Sales.
तुम्ही मला अंडी विकताना फारसे पाहिले असेल असं नाही. दूध विकण्यासाठी मी घरोघरी फिरत नाही. तुपाची जाहिरात करून ग्राहक शोधत बसत नाही.
तरीही आज तुपासाठी ग्राहकांना तीन-साडेतीन महिने प्रतीक्षा करावी लागते. पनीरसाठी 15–20 दिवसांची प्रतीक्षा असते. अंडी उपलब्ध झाली की ती लगेच संपतात.
हे फक्त उत्पादनामुळे झालं नाही.
विश्वास, गुणवत्ता, वेगळेपणा आणि वर्षानुवर्षांची Goodwill यामुळे झालं.
म्हणून शेतकऱ्यांनी एकदा स्वतःच्या शेतीकडे व्यवसायिकाच्या नजरेने पाहा.
Input Cost कमी करा.
पाणी आणि Labourचा कार्यक्षम वापर करा.
Output Quality वाढवा.
Value Addition करा.
Productला वेगळेपणा द्या.
Brand आणि Goodwill तयार करा.
आणि मग Sales व Margin वाढवा.
शेती म्हणजे फक्त बी पेरून उत्पादन काढणं नाही.
शेती हा व्यवसाय आहे.
आणि व्यवसायात प्रत्येक वेळी प्रश्न असतो—
“मी खर्च किती कमी करू शकतो आणि एका रुपयाच्या Inputमधून जास्तीत जास्त Value किती निर्माण करू शकतो?”
म्हणून आता ठरवा.
**दरवर्षी बाजारभावाला, खताच्या भावाला, मजुरीला आणि सरकारला दोष देत बसायचं?
की आपल्या शेताकडे एका बिझनेसमनसारखं पाहायचं?**
रडत बसणारा शेतकरी व्हायचं की स्वतःच्या उत्पादनाची Value निर्माण करणारा व्यवसायिक शेतकरी व्हायचं?
अंडी आणि मांस पचायला जड म्हणून श्रावण महिन्यात बंद करायचे, पण पाऊस पडतोय म्हणून गरमागरम वडा-पाव आणि भजीवर ताव मारायचा—हा आपल्या आहारातील एक विलक्षण तर्क आहे.
अंडं पाहिलं की श्रावणात अचानक आपल्या पचनसंस्थेची काळजी जागी होते. “अंडं जड असतं, पचायला वेळ लागतो!” मग मांस आला की त्याच्यावरही हाच शिक्का. पण त्याच वेळी गरमागरम वडा-पाव समोर आला की पचनसंस्था बहुधा श्रावणासाठी वेगळीच परवानगी घेऊन आलेली असते. दोन वडा, भरपूर चटणी, तळलेली मिरची आणि वरून चहा—हे मात्र श्रावणात अगदी सहज पचतं, अशी आपली श्रद्धा असते.
भजीचं तर विचारायलाच नको. बेसनाच्या पिठात बुडवून तेलात तळलेली भजी म्हणजे पचनासाठी काही साधं अन्न नाही. तळण्यामुळे त्यात चरबी मोठ्या प्रमाणात वाढते आणि चरबीमुळे पोट रिकामं होण्याचा वेग मंदावतो. म्हणजेच “जड”पणाचा निकष लावला तर भजीला अंड्यापेक्षा हलकं म्हणण्याचं कारण फारसं उरत नाही.
वडा-पावमध्ये तर मैदा किंवा पाव, बटाट्याचा वडा आणि तळण्यासाठी वापरलेलं तेल—सगळं एकत्र येतं. पोटासाठी हा काही साधा, हलका आहार नाही. पण श्रावणात अंड्याच्या बाबतीत मात्र अचानक आरोग्याची आणि पचनाची आठवण होते.
मग येते साबुदाण्याची खिचडी. साबुदाणा म्हणजे मुख्यतः स्टार्च. त्यात शेंगदाणे, भरपूर तेल आणि बटाटा घातला की हा पदार्थ कॅलरी आणि चरबीने आणखी समृद्ध होतो. त्यामुळे “साबुदाणा आहे म्हणजे हलकं आहे” असा निष्कर्ष काढता येत नाही. पदार्थाचा धार्मिक दर्जा आणि पचनावरचा परिणाम हे दोन वेगळे विषय आहेत.
दूधाबाबतही असंच आहे. काही लोकांना दूध सहज पचतं, तर lactose intolerance असणाऱ्या लोकांना दूध घेतल्यावर गॅस, पोट फुगणे किंवा जुलाब होऊ शकतात. दूध हे अंड्यापेक्षा आपोआप “हलके” किंवा “जड” असते असा सार्वत्रिक नियम नाही.
आणि अंडं? उकडलेलं अंडं हा protein आणि fat असलेला पदार्थ आहे. अंड्याचा protein मानवी शरीरात मोठ्या प्रमाणात digest आणि absorb होतो.
म्हणून प्रश्न श्रावणात अंडं खायचं की नाही हा नाही. प्रश्न असा आहे की आपण “पचनाला जड” हा निकष खरंच प्रामाणिकपणे वापरत आहोत का?
जर एखाद्याला श्रावणात अंडं किंवा मास खाल्ल्यावर प्रत्यक्ष त्रास होत असेल, तर त्या महिन्यात ते बंद करणं अगदी योग्य. प्रत्येकाची पचनक्षमता वेगळी असते. पण त्याच व्यक्तीने दुसऱ्या दिवशी चार भजी, दोन वडा-पाव आणि तुपाची साबुदाणा खिचडी खाऊन “श्रावणात अंडं जड आहे म्हणून बंद केलं” असं सांगितलं, तर प्रश्न पचनाचा कमी आणि आपल्या समजुतींचा जास्त आहे.
पचनसंस्थेला कॅलेंडर दिसत नाही. तिला श्रावण दिसत नाही. तिला उपवास दिसत नाही. तिला “शाकाहारी” किंवा “मांसाहारी” असा धार्मिक शिक्का दिसत नाही. तिला दिसतात—protein, fat, carbohydrate, fiber, portion size आणि पदार्थ कसा तयार केला आहे.
म्हणून श्रावणापुरतं अंडी बंद करायची असतील तर नक्की बंद करा. मास बंद करायचा असेल तर करा. पण मग वडा-पाव आणि भजीसमोर उभं राहून आपल्या पचनसंस्थेला एवढंच सांगा—“तू आता सांभाळून घे. हे श्रावणात धार्मिकदृष्ट्या हलकं आहे!”
श्रावण संपला की पुन्हा अंडं आणि मास सुरू, आणि पचनसंस्थेलाही पुन्हा तिच्या जुन्या नियमांवर परत पाठवा!
जोशी सर