साईकृपा शेळी पालन

  • Home
  • India
  • Ausa
  • साईकृपा शेळी पालन

साईकृपा शेळी पालन उस्मानाबादी व ईतर उत्तम जातीचे बोकड म?

12/08/2026
20/07/2025
**ग्रामीण युवकांसाठी रोजगार आणि आर्थिक विकासाच्या संधी उपलब्ध करण्यासाठी कुक्कुटपालन व शेळीपालन प्रशिक्षण शिबिर**उंबडगा ...
18/12/2024

**ग्रामीण युवकांसाठी रोजगार आणि आर्थिक विकासाच्या संधी उपलब्ध करण्यासाठी कुक्कुटपालन व शेळीपालन प्रशिक्षण शिबिर**

उंबडगा खुर्द, ता. औसा, जि. लातूर येथे ग्रामीण भागातील युवकांना आर्थिक विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सात दिवसीय कुक्कुटपालन व शेळीपालन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन मा. प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त, लातूर विभाग, डॉ. नानासाहेब सोनवणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या मा. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी राष्ट्रीय पशुधन योजनेच्या अंतर्गत युवकांसाठी उपलब्ध रोजगाराच्या संधींचे सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेविषयी माहिती दिली आणि शासनाच्या विविध योजना कशा लाभदायक ठरू शकतात, यावर प्रकाश टाकला.

शिबिरात डॉ. नानासाहेब सोनवणे यांनी ग्रामीण युवकांनी पारंपरिक शेतीव्यवसायासोबत कुक्कुटपालन व शेळीपालन यांसारख्या पूरक व्यवसायाकडे वळावे, यासाठी प्रेरित केले. त्यांनी पशुपालन क्षेत्रातील आर्थिक शाश्वततेवर आणि रोजगार निर्मितीच्या अनंत संधींवर भर दिला.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. योगेशसिंह बायस (पशुधन विकास अधिकारी, प्रशिक्षण केंद्र मुरुड) यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. अनिल लसणे (पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती औसा) यांनी केले.

गावातील सरपंच श्री. कोळपे साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी श्री. मोरे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह अनेक युवक-युवती शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यशस्वी आयोजनासाठी श्री. शेल्लाळे (पशुधन पर्यवेक्षक), श्री. नामवाड (सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, अलमला), श्री. किरण कोळपे व बळीराम मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना आधुनिक पशुपालन तंत्रज्ञान, शासकीय योजना, व आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने मार्गदर्शन मिळाले. युवकांनी या संधीचा लाभ घेत रोजगारनिर्मितीच्या नवीन वाटा शोधण्याचा निर्धार व्यक्त केला.

प्रशिक्षणाचा आजचा पहिला दिवस    #कुकुटपालन    #शेळीपालन
17/12/2024

प्रशिक्षणाचा आजचा पहिला दिवस
#कुकुटपालन #शेळीपालन

13/12/2024

#शेळीपालन #कुकुटपालन

Call: 095034 05702

उस्मानाबादी व ईतर उत्तम जातीचे बोकड म?

Address

Ausa
413520

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when साईकृपा शेळी पालन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share