संदिप गोळेगावकर.आपंल बेट जांभुळ बेट

  • Home
  • India
  • Delhi
  • संदिप गोळेगावकर.आपंल बेट जांभुळ बेट

संदिप गोळेगावकर.आपंल बेट जांभुळ बेट जांभुळ बेट संवर्धन समिती �

तीन वर्षा पासून जांभूळबेटावर निनादत आहेत राष्ट्रगीताचे सूर. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा  तालुक्याच्या गोदावरी...
27/01/2025

तीन वर्षा पासून जांभूळबेटावर निनादत आहेत राष्ट्रगीताचे सूर.
मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्याच्या गोदावरी नदीच्या मध्ये भागी वसलेले एकमेव निसर्गरम्य पर्यटनस्थळ गोळेगाव जांभूळ बेट आहे. या जांभुळबेटा वर दर वर्षी प्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
'भारत माता की जय', 'प्रजासत्ताक दिनाचा विजय असो', 'आमचं बेट हरीत बेट, आमचं बेट जांभूळबेट' अशा गर्जनांसह राष्ट्रगीताच्या सुस्वरांनी जांभूळबेटाचा आसमंत दुमदुमून गेला. पंचक्रोशीतील उत्साही पर्यावरणप्रेमीं व क्रिएटिव्ह अकॅडमी चे विद्यार्थी यांनी जांभूळबेटावर उपस्थिती लावली.
यावेळी जगदीश जोगदंड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंदराव दुधाटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सचिन शिंदे, वैभव लिंगायत उपस्थित होते. प्रमुख उपस्थितात पर्यावरणप्रेमी अर्जुन दुधाटे, राम दुधाटे, पंढरीनाथ शिंदे, गजानन चुडावकर, गोविद जाधव, सचिन चांदणे, सोपान दुधाटे, लक्ष्मण दुधाटे, ज्ञानेश्वर दुधाटे आदींचा समावेश होता. सूत्रसंचालन क्रिएटिव्ह अकॅडमी चे ऋषिकेश पौळ यांनी केले. संदीप दुधाटे यांनी आभार मानले.
कृषिभूषण कांतरावकाका झरीकर यांच्या अनोख्या संकल्पनेतून दिवसेंदिवस वनराईने नटत असलेल्या बेटावर राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण झाले पाहिजे ही बाब पुढे आली. कांतराव देशमुख झरीकर यांची ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पर्यावरणप्रेमीं ही प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठीं सरसावले.
बेटावर जाण्या - येण्यासाठी बोटीच्या व्यवस्थेसह मंदिराची रंगरंगोटी, स्वच्छता आदी कामे पूर्ण झाली असून पर्यटकांचा ओढा वाढला आहे. जांभूळ, बांबू, मोहगणी, सिताफळ, तुती आदि झाडे लावून जांभूळबेट संवर्धन समिती स्थापन करून युवा कार्यकर्ते यांनी लोकसहभागातून विद्यूत मोटार बसवून ठिबक सिंचनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या कामी नांदेड येथील वृक्षमित्र फाऊंडेशनने पुढाकार घेऊन खूप मोठी मोलाची मदत केली आहे.

Address

गोळेगाव.ता.पुर्णा.जि.परभणी
Delhi

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when संदिप गोळेगावकर.आपंल बेट जांभुळ बेट posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category