06/01/2025
बहुगुणी आवळा !
ताजे, रसरशीत मोठ मोठे आवळे बाजारात उपलब्ध असतात. आवळा म्हणजे स्वस्तात मिळणारं, आरोग्यास मोलाचे फायदे देणारं फळ आहे. आवळ्याचे विविध पदार्थ बनवून चविष्ट खाण्याची जशी सोय केली जाते तसेच आवळ्याचे आरोग्यास फायदेशीर असे प्रकारही केले जातात. आवळ्याचा मोरावळा अर्थात मुरांबा हा असाच एक आरोग्यास फायदेशीर पदार्थ आहे.
आवळ्याचा रस हा व्हिटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत आहे , जे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे जे अँटिऑक्सिडंट (१) म्हणून कार्य करते. आवळ्यामध्ये कॅरोटीन असते, जे दृष्टी सुधारण्यास आणि वय-संबंधित मॅक्युलर डिजेनेरेशनचा धोका कमी करण्यास मदत करते. ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी सकाळी ‘मोरावळा’ खाल्ल्यास फायदेशीर ठरेल. लघवी साफ न होणे, आम्लपित्त, चक्कर येणे, पोट साफ न होणे अशा अनेक तक्रारींवर आवळा अत्यंत गुणकारी आहे. नियमितपणे आवळा खाल्ल्यास किंवा आवळ्याच्या रसाचं सेवन केल्यास शरीरातील रक्ताभिसरणाचे कार्य सुरळीत होतं. आवळ्यात ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा रोगावर आवळा उत्तम औषध आहे.
असा आहे बहुगुणी आवळा !