23/04/2026
रावस मासा चे फायदे :
सॅल्मन मासा हा आरोग्यासाठी खूप फायद्याचा ठरतो. सामान्यता साल्मन माशांपासून उच्च दर्जाचे प्रोटीन आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड मिळते. त्याबरोबरच अनेक आवश्यक ते विटामिन जसे की, B3, B5, B6, B12, vitamin D , Vitamin E आणि विपुल प्रमाणात मिनरल्स देखील मिळतात त्यामुळे हा माश्याचे सेवन मानवी आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरते म्हणून हा मासा जगभरामध्ये खाण्यासाठी खूप लोकप्रिय समजला जातो.
1. वजन कमी करण्यासाठी :
वजन कमी करण्यासाठी सॅल्मन मासा खूप फायद्याचा ठरतो. एका संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, salmon माशाचे सेवन केल्यास आपले वजन कमी होते. कारण या माशामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे भाजलेले salmon fish खाणे आपले वजन नियंत्रित करण्यासाठी फायद्याचे ठरतात.
2. हृदयरोगाच्या आजारासाठी :
अलीकडच्या काळामध्ये हृदय रोगाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दहा मधील प्रत्येक एक व्यक्तीला हृदयरोगाचा आजार पाहायलाच मिळतो. त्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या संबंधित आजारावर साल्मन फिश खूप फायद्याचा ठरतो.
Salmon Fish मध्ये असलेले Omega-3 फॅटी ऍसिड हे हे हृदय विकार यासाठी खूप फायद्याचे असते. त्यामुळे ज्या लोकांना हृदय संबंधीचा कसलाही आजार असल्यास त्यांनी Salmon Fish चे सेवन केल्यास त्यांना फायदा होतो.
3. केसांसाठी फायदे :
केसांना निरोगी ठेवण्यासाठी Salmon Fish खूप फायद्याचा ठरतो. NCBI म्हणजेच नॅशनल सेंटर ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन च्या म्हणण्यानुसार, Salmon Fish मध्ये विटामिन डी जे प्रमाण विपुल प्रमाणात आढळते. विटामिन डी केसांच्या आरोग्यासाठी फायद्याचे असते. त्यामुळे केसांच्या संबंधित कुठल्याही समस्या असतील त्यांनी रावस मासा चे सेवन केल्यास फायदा होतो.
4. त्वचेसाठी फायदा :
त्वचा च्या संबंधित सर्व समस्यांवर Salmon Fish चा मोठा फायदा होतो कारण Salmon Fish मध्ये प्रथिनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे प्रोटीनचे सेवन हे आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरते. त्यामुळे त्वचेच्या संबंधित आजार असल्यास आपल्या आहारामध्ये रावस मासा याचे सेवन केल्यास आपल्याला फायदा होतो.
5. सूज कमी करण्यासाठी कायदा :
Salmon Fish चा उपयोग शरीरात होणाऱ्या काही विविध प्रकारची सूज कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. Salmon fish मध्ये Omega-3 फॅटी ऍसिड असते म्हणजे दाहक विरोधक मानले जाते. त्यामुळे शरीराला दाह किंवा सूज आली असेल तर या रावस माश्याचे सेवन केल्यास फायदा होतो.