14/08/2026
नागपूर
*आंतरराष्ट्रीय युवा दिन: अनुभव शिक्षा केंद्राचा अभिनव उपक्रम; तरुणाईमध्ये घडतेय सामाजिक परिवर्तनाची नवी स्पंदने!*
*नागपूर* :- *स्वच्छंद विद्यालय मांडवा* येथे अनुभव शिक्षा केंद्र नागपूर आयोजित *आंतरराष्ट्रीय युवा दिन विशेष परीक्षा कार्यक्रम* आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय युवा दिन थिम " *Different Contexts, Common Aspirations" "भिन्न संदर्भ समान आकांक्षा"* या विषयावर प्रश्नमंजुषा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात स्वच्छंद विद्यालय मांडवा येथील विद्यार्थी तसेच युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला अनुभव शिक्षा केंद्र मूल्य तसेच संविधानिक मूल्य आणि प्रशासन या विषयावर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आणि खेळाच्या माध्यमातून युवकांमध्ये धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, प्रामाणिकपणा,पर्यावरण सुरक्षा,श्रम प्रतिष्ठा या मूल्यांवर *अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा प्रशिक्षक प्रकाश राठोड* यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
*स्वच्छंद विद्यालय मांडवा येथील प्राचार्य भुते सर* यांचे सहकार्य तसेच कार्यक्रमाच्या नियोजनासाठी *राजेश बहरुपी सर, कुहिटे सर* यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अनुभव शिक्षा केंद्र प्रक्रिया समजून घेतली जरी तरुणांचे जीवन वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि स्थानिक वास्तवांनी घडत असले तरी, त्यांच्या आकांक्षा आश्चर्यकारकपणे सारख्याच आहेत. विविध देशांमध्ये आणि समुदायांमध्ये, तरुण सन्मान, संधी, अर्थपूर्ण सहभाग, सन्मानजनक काम, दर्जेदार शिक्षण आणि एक शाश्वत भविष्य शोधत आहेत.आणि त्यामुळे युवकांनी केवळ शिक्षण घेण्यापेक्षा *सामाजिक जबाबदारी स्वीकारून नेतृत्वाच्या माध्यमातून समाजाच्या विकासात योगदान द्यावे*, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
Nagpur News Nagpur Municipal Corporation Nagpur Police Commissionerate District Updates