CKP Food Carnival, Nashik

CKP Food Carnival, Nashik Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from CKP Food Carnival, Nashik, Food stall, Vishwas Lawns, Atharv Colony, Savarkar Nagar, Nashik, Nashik.

येताय ना!!!
24/11/2025

येताय ना!!!

20/11/2025
` *एक दिवस कायस्थांचा'*  *शनिवार दि. २९ नोव्हेंबर २०२५* २९ नोव्हेंबर रोजी सीकेपी समाजाचा आई एकविरा देवीचा उत्सव एकविरा ग...
25/10/2025

` *एक दिवस कायस्थांचा'*
*शनिवार दि. २९ नोव्हेंबर २०२५*
२९ नोव्हेंबर रोजी सीकेपी समाजाचा आई एकविरा देवीचा उत्सव एकविरा गडावर साजरा होत आहे. उत्सवाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. विविध ठिकाणांहून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय हजारों बांधव आपल्या वाहनांनी/ रेल्वेने एकविरा गडावर पोहचणार आहे. आगाऊ नावे नोंदविल्यास एकविरा भक्तांची व्यवस्था कार्यक्रमस्थळी म्हणजेच एकविरा दर्शन ड्रिम व्हिला येथे करण्यात येणार आहे. सकाळची न्याहारी, शाकाहारी व मासांहारी भोजनाची व्यवस्था आहे. बसने येणार्यांसाठी रु.६००/- शुल्क आकारले जाणार आहे. कार्यव्रâमास येणार्या भक्तांसाठी प्रती व्यक्ती रु.२००/- आकारले जाणार आहेत.
यावर्षी सकाळी गडावरील अभिषेक व पालखी सोहळा झाल्यानंतर सर्व कार्यक्रम एकविरा मंदिराकडे जाणार्या मुख्य रस्त्यावरील `ड्रिम व्हिला' एकविरा दर्शन येथे होणार आहेत. उत्सवासाठी आदल्या दिवशी भक्तांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी प्रति व्यक्ती रु.५००/- आकारले जाणार आहेत. त्यामध्ये राहण्याची व्यवस्था, रात्रीचे भोजन समाविष्ट आहे. या कार्यक्रमानिमिताने विविध समित्या तयार करण्यात आल्या आहेत. यावर्षीचा उत्सव नियोजनबध्द पध्दतीने केला जाणार आहे. यंदा उत्सवाचे ९वे वर्षे आहे. दरवर्षी एखादी जागा भाड्याने घेवून आपण उत्सव साजरा करीत असतो. यावर्षी विश्वस्त समितीची निर्मिती करुन स्वत:च्या जागेत उत्सव करण्याची मनिषा आहे. त्यादृष्टीने यावर्षी निश्चितच प्रगती होणार आहे.
यावर्षी ड्रिम व्हिला एकविरा दर्शन येथे होणारा कार्यक्रम पुढील प्रमाणे असणार आहे. तसेच यावर्षी प्रथमच एकविरा देवीची प्रतिकृत्ती कार्यक्रमस्थळी उभारली जाणार आहे.
सकाळी ६वा. गडावरील मंदिरात पहाटेची पूजा, काकड आरती व अभिषेक ३ जोडप्यांकडून. सकाळी ६ वा. पालखीतील पादुकांवर कार्यक्रमस्थळी अभिषेक व पूजा सकाळी ६.३०वा. पालखीचे गडाकडे प्रस्थान सकाळी ७ वा. कार्यक्रमस्थळी आई एकविरा देवी मुखवटा स्थापना, पूजन, व अभिषेक (१५ जोडपी किंवा व्यक्ती) सकाळी ८ ते १० वा. नाष्टा, (उपवासाचे पदार्थां सहित), चहा /कॉफी सकाळी १०वा. एकविराआई सर्वसौभाग्यवर्धिनी यज्ञ (१५–२० जोडपी किंवा व्यक्ती) (अभिषेक सहभाग शुल्क रु.११००/- प्रति जोडपे, गडावरील अभिषेक, पूजा शुल्क रु. ७५००/- प्रति जोडपे. दुपारी १२वा. एकविरा आई गोंधळ दुपारी १.१५ वा. एकविरा आई महाआरती व महानैवेद्य दुपारी १.३० नंतर-महाप्रसाद (शाकाहारी / मासांहारी) दुपारी ४वा. समारोप. पालखी गडावरून खाली आल्यानंतर होम-हवन ठिकाणी दर्शनासाठी ठेवली जाणार आहे.
एक दिवस कायस्थांचा उत्सवासाठी विशेष बसेसची सुविधा उपलब्ध आहे.
बस प्रवासाचे मार्ग –
बस क्र.१ : *बोरिवली/गोरेगांव व्हाया ठाणे.* संपर्क: प्रसाद नाडकर ८४५०९१४४९२/ राजू देशमुख ९७०२९३९५२८
बस क्र. २ : *ठाणे* जयदिप कोरडे ९८२०१८७७२१ / स्वप्निल प्रधान ९८२१४०५४६०
बस क्र. ३ : *डोंबिवली/कल्याण/अंबरनाथ/बदलापूर/कर्जत/* खोपोली. संपर्क : तेजस महागावकर ७६६६७५५५०२ जीपे नं. ७७३८७ ७५५०२ / गौरी मथुरे ८७९३६०५४१४
बस क्र. ४ : *भिवंडी* संपर्क : प्रबोध जयवंत ९३२६३५०८०८
बस क्र. ५ : *पुणे* संपर्क अंजली प्रधान ९६५७८९२२३६ / विद्या पागनिस ९९७००९७४७४ / मंदार कुळकर्णी ९८९०००२३३२
होम, अभिषेक व देणगीसाठी खाते तपशील :
Name: Pune CKP Family Public Trust
Bank: HDFC Bank, Hingne Khurd Branch
A/c No: 50200109272653
IFSC: HDFC0000825
रक्कम जमा करून पेमेंट स्क्रीनशॉट, संपूर्ण नावे व मोबाईल नंबर सदस्यांना व्हॉटस्अप वर पाठवावा.
तुषार राजे : ९८२०५ १८८६३
रघुवीर देशमुख ७३५०९ ९९१११
विकास देशमुख ९६१९१ ८५००४
राजेश देशपांडे ९८२०४ ९३८८८
निलेश गुप्ते ८६६९१ ५१५३३
जयदीप कोरडे ९८२०१ ८७७२१
स्वप्निल प्रधान ९८२१४ ०५४६०
मिलिंद मथुरे ९८२३१ ७५४८९
मंदार कुळकर्णी ९८९०० ०२३३२
अंजली प्रधान ९६५७८ ९२२३६
सागरीका कर्णिक ९२२३४ ४५४९२
संपर्क कार्यालय : कायस्थांची श्री एकविरा विश्वस्त संस्था, १०१, भाग्यवृध्दी, नाईकवाडी,
छत्रपती शिवाजी महाराज पथ (स्टेशन रोड), ठाणे पश्चिम. फोन २५३०३४१२ मो. ९२२२१०५३३४

22/09/2022
30/11/2021
11/05/2019

समस्त नाशिककर सि के पी कुटुंबियांस सादर नमस्कार,
आज मी तुम्हा सर्वां समोर एका वेगळ्या निमित्ताने येत आहे.

आपल्या पैकी बहुतेकांना माहीत आहे की आपली अखिल भारतीय मध्यवर्ती सिकेपी संस्था गेले अनेक वर्षा पासून कार्यरत आहे आणि हे वर्ष आपल्या संस्थेचे निवडणुकीचे वर्ष आहे.

मी गेली तीन-साढेतीन वर्षे मी आपल्या नाशिक सिकेपी कल्बचा अध्यक्ष म्हणून आपल्या संपर्कात आहे व ह्या माध्यमातून ज्ञातीच्या इतर (शहरातील) व्यक्ती व संस्थांशी संबंध आला व विविध राज्यांतील/शहरांतील ज्ञाती बांधवांच्या ओळखी झाल्या.

आपण सर्व सभासदांच्या सहकार्याने नाशिक मधे, आम्ही कर्यकारिणी सदस्यांनी, सि के पी फुड कार्निवल भरविण्यास सुरुवात केली ज्यास तमाम नाशिक शहरवासीयांनी मोठ्या प्रमाणात पसंत केले तसेच ह्या निमित्ताने तमाम नाशिककरांना आपल्या ज्ञातिची आणि आपल्या खाद्य संस्कृतीची महती व माहिती कळली.

कार्ला गडावर 'एक दिवस कायस्थांचा' च्या निमित्ताने श्री तुषार राजे ह्यांच्या संपर्कात आलो आणि आई एकवीरेच्या सेवेची संधी मिळाली.

आता नोकरीतून निवृत्त झाल्यावर ज्ञातीसाठी अजुन काही भरिव काम करता आले तर करावे अस मनात विचार आला आणि योगायोगाने श्री राजे ह्यांनी आपल्या ह्या मध्यर्वती संस्थेच्या निवडणुकीत उपाध्यक्ष पदासाठी निवडणूकीत सहभागी होणार का? अशी विचारणा केली. ज्ञाती कार्याची एक उत्तम संधी व दिशाच समोरुन चालून आलेली पाहून मी त्वरीत होकार दिला आणि बोहल्यावर चढण्यास सज्ज झालो.

ह्या निवडणुकीचे इतर तपशील, मी ज्या पॅनल मधुन निवडणूक लढवित आहे त्या पॅनलचे नाव व पॅनल मधिल माझे इतर सहकारी, आमची उद्दिष्टे इत्यादी तपशील लवकरच आपल्या समोर मांडली जातील.

आपणास नम्र विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी आपल्या कुटुंबातील अथवा आपल्या माहितीतील सर्व मतदार सभासदांना मला व माझ्या पॅनल मधिल सर्व उमेदवारांना मतदान करावण्याचे आवाहान करावे व आम्हाला ज्ञातीसाठी कर्य करण्याची संधी द्यावी.

03/12/2018

आज पासून सी के पी (जमात ) समाजाने करावयाच्या गोष्टी:--

१)विद्यार्थ्यांनी शिक्षणावर भर द्यायचा आहे.
२)ऐकमेकांना नोकरी-व्यवसायासाठी शक्य असेल तरमदत करायची आहे.
३) मराठा, ब्राम्हण समाज सोबतचे जुने वाद विसरायचे आहेत.
४)सर्व "सी के पी " संघटनांमधून जमेल इतकं काम करायच आहे.
५)मराठी, राष्ट्रभाषा व इंग्रजी चा पाया पक्का करायचा आहे.
६)वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावून घ्यायची आहे.📰
७)भावांसोबत चांगल् राहायच आहे.
८)सर्वांना सोबत घेत प्रगती करायची आहे.
९)कोणत्या तरी नविन व्यवसायाची सुरूवात करायची आहे.
१०)"सी के पी "सत्ता समाजात निर्माण करायची आहे.(आदर, सन्मान, इतर समाजाला वाटणे.) त्यासाठी आपल्या मूळ पायाभूत गोश्टी न विसरणे. बोलणे व्यवस्थित असावे, थोडक्यात इतर समाजाने तुमच्याकडे सी के पी म्हणून पहावे, असे वागावे.
११) आपले मित्र कोण ? शत्रू कोण याचे भान ठेवायचे.
१२)फक्त मरण दारी आणी तोरण दारी एकत्र न येता दर महिन्याला ठराविक ठिकाणी एकत्र येऊन विचार विनिमय करायचा.
१३)एकमेकास सहाय्य करु अवघे धरू सुपंथ हा मत्र ध्यानात ठेवायचा.
१४) गुण दोषासह एकमेकांना स्विकारायचे आहे.
१५) समाजाचा उपयोग एखाद्या पक्षाचे तिकिट मिळविण्यासाठी करायचा नाही.
१६) विज्ञानाची कास धरायची पण अध्यात्मिकही असावे, श्रध्दा असावी, अंधश्रध्दा नसावी.
१७) खोट्या प्रतिष्ठेच्या नांदी लागायचे नाही. वास्तवात जगावे.
१८)समाजाच्या हिताचे जे जे असेल ते ते मान्य करायचे.
१९) समाजापेक्षा स्वतःला मोठे समजायचे नाही.
२०) नाहक व्यर्थ गप्पागोश्टी, फालतू पणा टाळावा, वेळ स्वत:च्या आर्थिक, अध्यात्मिक, कौटूंबिक, इ. प्रगतीसाठी खर्च करावा.
*हा संदेश जास्तीत जास्त " सी के पी" बांधवापर्यंत पोहचवा.*

🙏🏼🙏🏼🙏🏼

संपर्कातील १० सी के पी तरी हा मेसेज पाठवुया.....🙏🙏🙏🙏🙏

26/11/2018

बाजीप्रभू देशपांडे तांबड्या मातीतील रणमर्द ...!

हि कथा आहे शिवकाळातील....!!
बाजी प्रभू देशपांडे.हिरडस मावळातील सिंध गावाची फार मोठी आसामी.

बापजादे नावाजलेले पैलवान ,घरची परंपराच मुळी कुस्तीची .गावात बाजींचा चारचौकी देशपांडे वाडा होता, त्या वाड्यात समृध्द घोड्यांची पागा होती..
पागेच्या मागच्या बाजूला बाजींनी तालीम बांधली होती.

शिवरायांनी मांडलेल्या स्वराज्याच्या खेळात बाजी सुध्दा सामील झाले होते,पण त्या आधी बाजी बांदल देशमुख सरकारांचे दिवान म्हणून होते,राजांनी रायरी सर करून फितूर चंद्रराव मोर्यांना ठार केले तेव्हा त्यांना बाजीप्रभू देशपांडे हे सोन सापडलं,पण बाजी मनोमनी म्हणत असत कि राजे हे सोन आधी मातीमोल होत..
तुमचा स्पर्श झाला आणि जीवनाचे सोने झाले.राजाना तर रायरी जिंकल्यापेक्षा 'बाजी'मिळाल्याचा आनंद झाला होता..!!
बाजी स्वत पहाटे ३ वा.
उठत असत.पूर्वीचे लोक भल्या पहाटे आपला दिवस सुरु करत असे म्हणजे दिवसभराच्या कामाला जास्त तास मिळत असे.

पशुपक्षी बघा आपला दिवस कसा भल्या पहाटे सुरु करतात अगदी तसेच.
बाजींच्या पदरी शूर धिप्पाड पैलवानांची फौज होती.सर्वजन कसलेले पैलवान हो..
सर्वच लढतीला उठत असत पहाटे...!
बाजींचे थोरले बंधू फुलाजी हे तर कुस्तीचे अतिशय व्यसनी.

३ तास लढत झाल्याशिवाय त्यांचे मनच भरत नसे..!!
तर हे देशपांडे कुटुंब कुस्तीचे अतिशय नादिष्ट्य ..!!
बाजी स्वत लढत करत असत ,नंतर ५ हजार जोराचा ठेका एका दमात मारत असत ,तद्नंतर २ तास हात्यारांचा सराव.मग अंघोळ पाणी ..
तद्नंतर शंभू-भवानीची यथासांग पूजा झाली कि मग २ शेर तुपातील शिरा न्याहारीला यायचा.

त्यानंतर ५ शेर दुध पिउन मगच बाजी शिवरायांना भेटायला राजगडी रवाना होत असत...!
एवढा प्रचंड व्यायाम, आणि खुराक ..?
मग काय ..
बाजींचे काम काय लहान सहान होते ? अहो,त्यांच्या एका हाकेत बारा मावळ भगव्याखाली जमा होत होता ...
माणसासारखी माणसच काय पण हत्ती घोडे सुध्दा त्याना वचकून असत..!सकाळचा व्यायाम,खुराक,पूजा झाली आणि दिवसभराचे राजकारण संपवून सायंकाळी सुध्दा कुस्ती खेळल्याशिवाय अन्नाचा कण मुखात जात नसे..!

आणि एके दिवशी ६ महिने सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकलेल्या राजांनी तांबड्या मातीत रंगलेली बाजींची फौज घेवून सिद्दीच्या वेढ्याबाहेर उडी मारली ..!
आणि रक्ताची रंगपंचमी खेळून बाजींनी राजांना सहीसलामत वेढ्याबाहेर काढले..
८ तास चिखल वाटेने ,भर पावसात धावत येवून आणि पुढे ६ तास लढून .

बाजी-फुलाजी या सख्या भावांनी राजांसाठी, माय्भूसाठी स्वताच्या देहाची चाळण होऊन सुध्दा ती खिंड सोडली नव्हती...
तोफेंचे बार ऐकूनच तो देह ठेवला..
हि रग,हि जिद्द,हि तळमळ,हि रक्ताची उसळी ..
हि मातृभूमीवर मरायची आग फक्त तांबडी मातीच देवू शकते..
त्याचसाठी हा आजच लेख....!
हे जे बाजी-फुलाजी किंवा अन्य मराठेशाहीचे असे मरायला तयार होत होते हि खरी शिवरायांच्या कार्याची पावती आहे.शिवछत्रपती जर खरे ओळखायचे असतील तर या नरवीरांच्या बलिदानातून ओळखावे.

कोण तोफेचे आवाज होईपर्यंत प्राण सोडत नाही, तर कोणी पोटच्या पोराचे लग्न टाकून गड सर करायला जातो ...
कोणं मृत्युच्या पालखीत हासत हासत बसतो ..
तर कोणी खोटा शिवाजी म्हणून मरणाच्या अंथरुणात झोपतो..!
यांचे हे असामान्य बलिदान हि शिवराय करत असलेल्या महान कार्याची खरीखुरी पावतीच होय..!

जय शिवराय
जयोस्तु महाराष्ट्र...

नरवीर बाजीप्रभू देशपांडे ह्यांना विनम्र अभिवादन..

सहजा सहजी ही पोस्ट शेअर होणार नाही

!! राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसूर्यजाळं !!

22/11/2018

*ग्रूप सदस्यांना आवाहन*........
*२४ नोव्हेंबर या दिवशी अधिकाधिक कायस्थांनी कार्ले गडावर एकवीरा देवीचे दर्शनासाठी एकत्रित* व्हायचे आहे त्यासाठी अनेक कायस्थ एकत्रितपणे किंवा आपापल्या वाहनाने गडावर दाखल होणार आहेत. या प्रकारे आपण आपल्या देवीचा उत्सव साजरा करणार आहोत.
*कार्ले गडावर आपल्या ज्ञातीची वहिवाट चालू व्हावी यासाठी आपणच प्रयत्नशील असणे आवश्यक असून अधिकाधिक बांधवानी तेथे उपस्थिती दिल्यास आपण आपला हक्क राखून ठेवण्यास हातभार लावू शकू*. हे काम कोणा एकाचे नसून यात *सर्व समाजाचा फायदा* आहे ही बाब लक्षात घेऊन अधिकाधिक कायस्थांनी तेथे *हजेरी लावून मनोभावे मातेचे दर्शन घ्यावे* व त्यासाठी सर्वानी २४ तारखेस गडावर उपस्थिती द्यावी अशी विनंती .
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

09/11/2018

२४ नोव्हेंबर - एक दिवस कायस्थांचा !

सर्व ज्ञातिबांधवांना व माहेरवाशिणींना आग्रहाचे आमंत्रण.....

एकेकाळी अखंड भारताच्या तीन- चथुर्तांश भूमीवर कायस्थांचे राज्य होते त्यांचाच वारसा अभिमानाने सांगणारा आपला चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज. बुद्धी, शौर्य व इमान हा त्रिगुणी संगम असणारा आपला ज्ञातिबांधव वैयक्तिक खूप पुढारलेला व यशस्वी आहे पण एकत्रित समाज म्हणून खूप विस्कळीत व असंघटित आहे. म्हणूनच कमकुवत होऊन आज अस्तित्वासाठी धडपडतोय. कारणे बरीच आहेत पण
सर्वात प्रमुख कारण एकांगीपणा !
रोज आपण फक्त स्वतःसाठी जगत असतो . 'मी, माझा संसार व माझे कुटुंब' ह्यातच आपण एवढे गुरफ़टले गेलो आहोत की आपल्या ज्ञाती प्रती आपली काही जबाबदारी आहे किंवा आपण आपल्या समाजाचे काही देणे लागतो हेच विसरून गेलोय . अस्तित्वाची लढाई जर का आपल्याला जिंकायची असेल तर समाज म्हणून एकत्र येणे ही काळाची गरज आहे. आणि समाजाला एकत्र आणायचे असेल तर धार्मिक उत्सवासारखे दुसरे साधन नाही. 'एक दिवस कायस्थांचा' हा उत्सव आपल्या समाजाला एकत्र आण्यासाठी पहिले पाऊल आहे. चला तर आपल्या समाजासाठी, आपल्या अस्तित्वासाठी आणि आपल्या येणाऱ्या पिढीसाठी वर्षातील फक्त एक दिवस आई एकविरादेवीच्या चरणावर व्हाऊया .
श्री. तुषार राजे साहेबांची संकल्पना व सीकेपी संस्था आयोजित 'एक दिवस कायस्थांचा' हा उपक्रम गेल्या वर्षांपासून आई एकविरा गडावर सुरु झाला.
"संपूर्ण देशातील सीकेपी समाज एक व्हावा व त्यातून समाजाभिमुख उपक्रम व बदलत्या स्थितीनुसार ज्ञातीच्या गरजा ओळखून काम करण्यासाठी आई एकविरा मातेच्या साक्षीने एकविरा गडावर 'एक दिवस कायस्थांचा' हा अभिनव उपक्रम राबवुया." इति - तुषार राजे. अशा उदात्त हेतूने केलेले आवाहान व ज्ञानतीबांधवांनी त्याला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादा मुळे ह्या उपक्रमाला उत्सवाचे रूप आले. वर्षभर ज्ञातिबांधव वेळोवेळी "यंदाच्या वर्षी हा उत्सव कधी साजरा करणार ?" ह्याची चौकशी संस्थेकडे करत होते ह्यातच 'एक दिवस कायस्थांचा' चे यश आहे.
शनिवार २४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या
भव्य कार्यक्रमाची रूपरेषा :
सकाळी ८.३० वा पायरीपूजन , पायथ्याला असलेले आई एकविरा देवीचे पूजन व पाच पायरी येथे पूजन .
सकाळी ९.०० वा एकविरा गडावर संत श्री राम मारुती महाराज यांच्या पादुकांचे आगमन होणार आहे.
आई श्री एकविरा देवी ह्या संत श्री राम मारुती महाराज घराण्याच्या कुलदेवी. त्यामुळे संत श्री राम मारुती महाराजांच्या पादुकांचे एकविरा गडावर आगमन हा अमृततुल्य योग आहे.
संत श्री राम मारुती महाराज यांच्या पादुकांचे विधिवत पूजन सकाळी ९. ०० वा होणार आहे. त्यानंतर ज्ञातिबांधवांना
पादुकांचे दर्शन घेता येईल.
सकाळी ९. ३० वा नाथपंथी होम-हवन
सकाळी ११.३० वा देवीचा गोंधळ
दुपारी १.०० वा महाआरती
आई एकविरा गडावर येणाऱ्या ज्ञाती बांधवांसाठी माफक दरात विविध सोई केल्या आहेत.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पुणे व नाशिकहून बसेसची सोय केली आहे.
सकाळी गडावर मीनाताई ठाकरे सभागृह येथे न्याहारी - चहा, दुपारी शाकाहारी/ मासाहारी सीकेपी पद्धतीचे सुग्रास जेवण व दुपारी चहा.
गडाखाली रिक्षा व डोलीची व्यवस्था
ही केली आहे. जे ज्ञातिबांधव आदल्या
दिवशी येणार असतील त्यांची गडाच्या
पायथ्याशी राहण्याची व्यवस्था केली
आहे.
ज्ञातिबांधवांना व माहेरवाशिणींना विनंती आहे की आपण स्वतः व आपल्या कुटूंबातील सर्व सदस्यांना घेऊन शनिवारी २४ नोव्हेंबर ला एकविरा गडावर येऊन एकविरा मातेचे दर्शन घेऊन आपल्या ज्ञातीची एकजूट दाखवावी. आपली उपस्थिती हाच आम्हाला पाठिंबा होय !
प्रशांत शिलोत्री
ठाणे

26/10/2018

*शनिवार दि. 24 नोव्हेंबर 2018 रोजी*
*`एक दिवस कायस्थांचा' एकविरा गडावर**
24 नोव्हेंबर रोजी सीकेपी समाजाच्या आई एकविरा देवीचा उत्सव आपण एकविरा गडावर साजरा करणार आहोत. उत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. यावर्षी अधिक चांगल्या प्रकारे उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध ठिकाणांहून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय हजारों बांधव आपापल्या वाहनांनी /रेल्वेने एकविरा गडावर पोहचणार आहेत. आगाऊ नावे नोंदविल्यास येणाऱ्या भक्तांसाठी गडावरीलच मॉसाहेब मिनाताई ठाकरे सभागृहात सकाळची न्याहरी व शाकाहारी, मासांहारी भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. बसने येणाऱ्या सर्वांसाठी ही व्यवस्था असणार आहे. बस प्रवासासाठी रुपये 600/- शुल्क आकारले जाणार आहे. फक्त नाश्ता व जेवणासाठी येणाऱ्या भक्तांकडून प्रती माणसी 300/- रुपये आकारले जाणार आहेत. आजच आपली नावे नोंदवा.
*श्री एकविरा देवी स्तुतीचे प्रकाशन*
यावर्षीच्या उत्सवात दादर, मुंबई येथील डॉ. प्रफुल्ल रणदिवे यांच्या श्री एकविरा देवी स्तुती या पुस्तिकेच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन एकविरा गडानजिकच असलेल्या खांडशी गांवच्या सरपंच सौ. वैदेही रणदिवे यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. यासमयी पंचक्रोशीतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
*रायगड जिल्ह्याची बस*
यावर्षी रायगड जिल्ह्यातील ज्ञातीबांधव एका विशेष बसने गडावर पोहचणार आहेत. महाड येथील अध्यक्ष रघुवीर देशमुख यांच्या पुढाकाराने बसचे आयोजन करण्यात आले आहे. महाडवरुन निघणार बस अलिबाग, नागोठणे, पेण, पनवेल मार्गे गडावर पोहचणार आहे.
बस प्रवासाचे मार्ग -
*बस क्र. 1* शिवसेना भवन दादर येथून सुटणार असून सायन
हॉस्पिटल, चेंबुर नाका, वाशी, नवरत्न हॉटेल, खारघर येथे थांबून गडाकडे रवाना होणार आहे.
*बस क्र. 2* - बोरीवली नॅशनल पार्क येथून सुटणार असून दहीसर नाका, फाउंटन हॉटेल, घोडबंदर रोड, आनंद नगर सिंग्नल, हॉटेल सूर्या पार्क, माजिवडा नाका, कोर्ट नाका, कळवा नाका, रबाळे पो.स्टे. मार्गे एकविरा देवस्थानाकडे जाणार आहे.
*बस क्र. 3 -* मुलूंड पूर्व जय गणेश सिनेमा येथून सुटणार असून ठाणे हरिनिवास, कोर्ट नाका, कळवा नाका, रबाळे पो. स्टे. (ऐरोली मार्गे) एकविरा गडाकडे रवाना होणार आहे.
*बस क्र. 4 -* डोंबिवली पेंढरकर कॉलेज येथून सुटणार असून आचार्य अत्रे नाट्यगृह कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, नेरळ, कर्जत मार्गे एकविरा गडाकडे जाणार आहे.
*बस क्र. 5 -* बाल गंधर्व नाट्यगृह पुणे येथून सुटणार असून पौंड रोड, एसएनडीटी, कोथरुड डेपो, चांदणी चौकमार्गे एकविरा गडावर येणार आहे.
दादर, बोरीवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण येथील बसेसस सकाळी 6 वाजता तर पुणे येथील बसेस सकाळी 7 वाजता सुटणार आहेत. सर्व बस प्रवास, नाश्ता, शाकाहारी-मासांहारी जेवण, दुपारी चहा आदींसाठी सहाशे रुपये आकारले जाणार आहेत. निराशा टाळण्यासाठी आपले नाव आजच नोंदवा.
एक दिवस कायस्थांचा एकविरा गडावर या अभिनव कार्यक्रमासाठी ठाणे येथे 26 ऑक्टोबर पासून कार्यालय सुरु करण्यात आले आहे. कार्यालयात श्री. अशोक कुळकर्णी हे सायंकाळी 4 ते 8 या वेळात उपलब्ध असणार आहेत. त्यांचा मो. क्र. 9987092195 आहे. कार्यालयाचा पत्ता : 101, पहिला मजला, भाग्यवृंध्दी बिल्डींग, नाईकवाडी, स्टेशन रोड, (मॅकडॉनल्ड समोर) ठाणे (पश्चिम), दूरध्वनी : 25303412 आपण येथेही नांव नोंदवू शकता.
*ठाणे* - राजेश देशपांडे 9820493888, अमित मेढेकर 9819847741, आदित्य देशमुख 8828751515, अशोक कुळकर्णी 9987092195, सौ. पूनम देशपांडे 9819913129, अशोक वैद्य 9819624021, सौ. राजश्री राजन शृंगारपुरे (माजी नगरसेविका) 9004484715, स्वप्निल प्रधान 9821405460, मंदार प्रधान 9930716065, अॅड. इंद्रजित कुळकणी 9869019513, चेतन शृंगारपुरे 981007138, प्रशांत शिलोत्री 9833326575, राजीव चित्रे 9820171416
*कल्याण* - मेघन गुप्तें 9930208842, नविन राजे 8390900253, संदेश कुळकर्णी 9833776029, पुरुषोत्तम फडणिस 9820527441, पराग कर्णिक 9220916524, सौ.राधिका गुप्ते 9022948078, दिपाली गुप्ते 8652418486, शैला पाटणकर 9892760570, निलम राजे 8425942630
*डोंबिवली* - आशिष कर्णिक 9323274667, तेजस महागांवकर 9320333688, सिध्दार्थ प्रधान 9819932136, वैभव कारखानिस 8108881606, विनायक प्रधान 9320386010, नंदकुमार राजे 9869857097, पूजा सुळे 7045358434
*उल्हासनगर* - विलास देशपांडे 9833435671, मिलिंद फणसे 8551860967
*अंबरनाथ* - स्वप्निल इनामदार 9920983335
*बदलापूर* - संगीता चित्रे 9370188837, गौरी गुप्ते 7350387788, चंद्रशेखर राजे 9920369679, निलेश दुर्वे 7720081323, विभा कर्णिक 8355833859
*दादर -* विकास जयवंत 9930935193, अॅड. बिना पै 9920064687, प्रमोद इनामदार 9967453130, राजीव पोतनिस 9821120581, अॅड. मिनल श्रृंगारपुरे 9987515256, *अंधेरी* -पुष्कर गुप्ते 9820997860
*परळ लालबाग -* शलाका पोतनिस 9892801557, सुजाता डोंगरे 9960286744
*वरळी* - विवेक देशमुख 9224163229
*चेंबूर -* योगिता देशपांडे 9892526118
*कुर्ला* - सोनाली राजे 9322046894,
भावेश चित्रे 7666551163,
सोनाली वासकर 9819491761
*विक्रोळी* - सुशिल दुर्वे 7977429750
*भांडुप -* विलास प्रधान 9769644580
*मुलुंड* - संदेश प्रधान 7506120942
*विलेपार्ले* - शकील कर्णिक 9821599957 ,
मेघनाथ हजरनिस 9820227062,
*गोरेगांव* - राहुल देशपांडे 9821351009,
राजू देशमुख 8097199347
*मालाड* - मिलिंद कर्णिक 9819943450
*बोरीवली -* प्रसाद नाडकर 8450914492,
स्वाती श्रृंगारपुरे 8692893984, मनिषा ताम्हाणे 7506460688
संजय कर्णिक - 9223445492
*दहिसर* - संजिव गुप्ते 9820910591
*विरार -* प्रसाद चिटणीस 9820882582
*डहाणू -* प्रदिप नाचणे 8793894871
*पुणे* - बिपीन देशमुख 9763728287, अंजली प्रधान 9657892236, कमलेश प्रधान 9823402101, स्वप्निल देशपांडे 9021033108, पराग प्रधान 7875446845, योगेश दिघे 9922936796, राजकुमार खोपकर 9822007094, अनघा लिखिते 7030870034, सिध्दी पुराणिक 8411000483,
*चिंचवड* - पराग सबनिस 9822173836, पूर्वा देशमुख 9767903553, सविता फडणीस 9767148355
*पिंपरी -* मंगेश गुप्ते 7276637926
*आकुर्डी -* पंकज फडणीस 9011078703
*तळेगांव, वडगाव व मावळ* - शेखर ताम्हाणे 7757018068, मिलिंद जयवंत 9930995263
*पनवेल* - पंकज दुर्वे 9773925577
*खोपोली* - सिध्देश सुळे गुरुजी 9923106478
*नागोठणे -* जीवन पत्की 9325888832
*पाली* - विशाल ताम्हाणे 8308200058
*अलिबाग -* मिलिंद राजे 9423892313
*उरण -* श्वेता कारखानिस 9619307585
*पेण* - केदार मोकाशी 9890970413, प्रदिप श्रृंगारपुरे 9823100414
*रोहे* - भूषण देशपांडे 9420393338, प्रसाद प्रधान 9730424209
*नेरळ* - प्रियंका कुळकर्णी 9821958232
*कर्जत -* विपुल प्रधान 8888839764, गजेंद्र अधिकारी 8308200058
*नाशिक -* मिलिंद मथुरे 9823175489, अमोघ ताम्हाणे 9975914319, मिलिंद चिटणीस 9822951090
*सातारा, कोल्हापुर -* महेश चिटणीस 9423866705, प्रकाश गुप्ते 8421651123, अशोक गुप्ते 7558230449
*सोलापूर* - भगवान परळीकर 9923795819
*नागपुर -* प्रमोदिनी क्षत्रिय 9730853962
*औरंगाबाद* - अमीता देशमुख 9822884910
*नांदेड -* अभय श्रृंगारपुरे 9422172023
*अकोला* - जितेंद्र लिखिते 9370993297
आपला नम्र
तुषार राजे
अध्यक्ष - सीकेपी संस्था
9820518863

Address

Vishwas Lawns, Atharv Colony, Savarkar Nagar, Nashik
Nashik
422013

Telephone

9823175489

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when CKP Food Carnival, Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category