13/07/2025
परभणी एमआयडीसी येथील पीएनपी एग्रो एंड स्नैक फ़ूड एलएलपी या कंपनीची राष्ट्रीय अन्न शिखर परीषद साठी निवड….
२५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२५ रोजी नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे होणाऱ्या जागतिक अन्न शिखर परिषदेसाठी परभणी जिल्ह्यातील अग्रगण्य फ़ूड प्रोसेसिंग कंपनी पीएनपी अॅग्रो अँड स्नॅक फूड एलएलपीची निवड झाली आहे. ही निवड जिल्हाभरातील अन्न प्रक्रिया उद्योगांमधून होते … मागील वर्षी यात परभणी ला सहभाग मिळाला नव्हता पण या वर्षी पीएनपी अग्रो परभणी ची निवड झाल्यामुळे या वर्षी परभणीचे नेतृत्व पीएनपी अग्रो करणार आहे. तरी या निवड़ीबद्दल कंपनी मैनेजमेंट चे कौतुक करण्यात येत आहे