31/08/2022
गणपती बाप्पा मोरया !!
गणपतीचा प्रसाद / खिरापत / पंचाखाद्य
साहित्य :- ३/४ वाटी सुके खोबऱ्याचा खिस
१ चमचा खसखस
१५० ग्राम खडीसाखर
४ वेलचीची पूड
६ ते ७ खारका
८ ते १० बदाम
कृती
खारकांच्या बिया काडून टाकाव्यात व पूड बनवावी. बदामाची पूड बनवा.
खिसलेले खोबरे मंद आचेवर तव्यात गुलाबी होईपर्यंत भाजून घेणे.
खसखस मंद आचेवर भाजून नंतर बारीक करून घ्यावी
बदामाची पूड व खारकांची पूड मंद आचेवर भाजून घ्यावी. जास्त भाजू नये.
खडीसाखर खलबत्यात कुटून घ्यावी .
बदामाची पूड खारकांची पूड, खसखस, खोबऱ्याचा खिस खडीसाखर, वेलची पूड मिक्सरवर एकत्र करावे.
हि खिरापत गणपतीला प्रसाद म्हणून वाटतात.
टीप :- खिरापत जास्त बारीक नकॊ असल्यास बदाम व खारका चिरून बारीक काप टाकावेत