01/05/2025
गोखले कट्टा - केटरिंग आणि टिफिन सर्व्हिसेस.
नमस्कार मंडळी!
* घरी वयस्कर मंडळी, आई बाबा - आजी आजोबा, आहेत आणि वयानुसार जेवण करता येत नाही/ बाहेरचं जेवण तेलकट/तिखट मिळतंय? आता चिंता नको. गोखले कट्टा आहे ना!
* आपलं अपत्य कॉलेजमध्ये शिकतंय आणि मेस/ खानावळीतलं जेवण त्रास देतंय? काळजी नको. गोखले कट्टा आहे ना!
* बाहेरून काही दिवस पुण्यात आलायत आणि दररोज हॉटेलमध्ये जेवून कंटाळा आलाय? फिकर नॉट. घरगुती जेवणासाठी गोखले कट्टा आहे ना!
* महिला मंडळाची भिशी/किटी पार्टी/ सहभोजन आहे आणि खात्रीशीर चविष्ट मेनू शोधताय? अहो गोखले कट्टा आहे ना!
* घरी पूजा/ सत्यनारायण/ लहानसहान भेटीगाठींचा कार्यक्रम आहे आणि तेलाचा तवंग आलेल्या/ मसालेदार जेवणावर काट मारायचाय? मग तर नक्कीच गोखले कट्टा आहे ना!
तर मंडळी, आम्ही गोखले कट्टा गेली पाच वर्षं घरगुती जेवणाची उत्तम चव सांभाळून केटरिंग करत आहोत. सकाळ - दुपार - संध्याकाळी नाश्ता, साधे तसेच पथ्याचे जेवण, डबे तर देतोच शिवाय वयस्कर मंडळी आणि कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पोटं न बिघडता जेवावेसे वाटेल असे अन्न पुरवतो. घरगुती कार्यक्रमांसाठीसुद्धा केटरिंग करतो. शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकार करतो आणि त्यासाठी आमचे स्वयंपाकघर, भांडी, साहित्य वेगवेगळे आहे बरं का! आमची खासियत अशी की डब्यांचा मेनू पंधरा दिवस तरी रिपीट होत नाही आणि कोशिंबिरीत भरलं केळं, तांबड्या भोपळ्याचं रायतं, आंबेडाळसुद्धा असते.
याशिवाय विविध लाडू उदा. पौष्टिक, मूग, बेसन, अळीव, सुकामेवा, रवा नारळ, रवा बेसन, थालीपीठ आणि उपवास भाजणी तसेच चिवडा यांचा मागणीनुसार पुरवठा वर्षभर सुरू असतो. पुण्यात सदाशिव, शुक्रवार, नारायण आणि शनिवार पेठ येथे वैयक्तिकरित्या आणि इतर ठिकाणी इतर कुरियर सेवांमार्फत ऑर्डर (सशुल्क) पोहोचवली जाते.
संपर्क साधण्यासाठी आमचे क्रमांक खाली नमूद करत आहोतच. केटरिंगसाठी लवकरच भेटू!
आशुतोष गोखले - 8408887894
मुग्धा गोखले - 9082627369