AKSHATA ENTERPRISES

AKSHATA ENTERPRISES AKSHATA ENTERPRISES is based on the principle of recycling and reuse of water.

We specialize in the manufacturing, Er****on and Commissioning of water and wastewater treatment plants.

दिवाळीत येणारी तिथी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो. हिंदुधर्मीयांचा हा एक मोठा सण आहे. या दिवसाला द...
02/11/2024

दिवाळीत येणारी तिथी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो. हिंदुधर्मीयांचा हा एक मोठा सण आहे. या दिवसाला दिवाळी किंवा दीपावली पाडवा असे म्हणतात. या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन उदार बळीराजाला जमिनीत म्हणजे पाताळात गाडले. बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले अशी अख्याईका आहे.

बलिप्रतिपदेतला बळिराजा हा शेतकरी राजा होता. त्याला तिन पावले जमिन दान स्वरूपात मागून विष्णूच्या वामन अवताराने मारले. हा राजा जनतेची काळजी घेत होता म्हणून त्याचं राज्य अजूनही यावं यासाठी ग्रामीण भागात अजूनही स्त्रिया भावाला ओवाळताना म्हणतात "इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो" अशी म्हण रूढ आहे.

महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया पतीला व माहेरच्या आणि सासरच्या इतर पुरुषांना ओवाळतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात.

उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते. श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा होते. या दिवशी देवाला अनेक पक्वान्नांचा आणि मिठायांचा डोंगर अर्पण केला जातो. म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हणतात.

दिवाळीतला पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी हा दिवस नव्या वर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीपूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. त्यांच्या जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता इत्यादी वाहून त्यांची पूजा होते.

संदर्भ : विकिपीडिया

लक्ष्मीपूजन ही भारतीय संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण पूजा आहे.अश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी ही पूजा प्रतिवर्षी के...
01/11/2024

लक्ष्मीपूजन ही भारतीय संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण पूजा आहे.अश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी ही पूजा प्रतिवर्षी केली जाते. दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला अधिक महत्त्व दिले जाते.
दिवाळीच्या अमावास्येला केरसुणी पूजन केले जाते. घरातून दारिद्र्य, अलक्ष्मी घालवून टाकणारी केरसुणी ही देवी स्वरूप मानली जाते म्हणून या दिवशी तिचे महत्व विशेष आहे.अश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतिव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते, अशी आख्यायिका आहे. समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा या रात्री केली जाते. श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. याखेरीज चलनी नोटा, नाणी, सोन्याचे अलंकार यांचीही पूजा यावेळी केली जाते. व्यापारी वर्गात यापूजेच्या वेळी फटाके उडवून आनंद साजरा केला जातो.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले अशी कथा आहे. पौराणिक साहित्यात लक्ष्मी ही विष्णूची पत्नी मानली गेली आहे.
संदर्भ: wikipedia.org

लक्ष्मीपूजन सण हिंदू धर्मातील स्त्रिया मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवे लावून सर्व स्त्रिया, मुले आनंदी असतात व त्या दिवशी दिपोत्सव साजरा केला जातो व लक्ष्मीचे पूजन करतात. एका लाकडी पाटावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून किंवा झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या ठेवून अक्षदांचे स्वस्तिक काढतात. श्री लक्ष्मी व श्री कुबेराची मूर्ती यांची मनोभावाने पूजा करतात. लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे. तर कुबेर हा संपत्ती रक्षक आहे.
आपल्याला पैसा कमविण्याची कला साध्य असते. पण कमवलेला पैसा कसा जवळ राखावा हे कुबेर शिकवतो. म्हणून व्यापारी लोक या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुबेराची पूजा करतात. लक्ष्मीला घरात पसारा, अस्वच्छता आवडत नाही. जिथे टापटीप असते, तिथे तीला राहायला आवडते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर केवळ टापटीपपणा म्हणजेच सुंदर असे नाही. तर ज्या व्यक्तीचे आचरण शुद्ध असते, मनात चालकपट किंवा मोह विकार व अवगुण नसतात, जो व्यक्ती आपला व्यवहार अतिशय कुशलतेने प्रामाणिकपणे करतो. ती व्यक्ती लक्ष्मी व कुबेरला प्रिय असते.
लक्ष्मीपूजनाचे व्यापारी वर्गातही खूप महत्त्व आहे. तसेच सामान्य मनुष्य सुद्धा हिंदू धर्मातील देवी-देवतांची पूजा करत असतो. परंतु दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच दुकानाची सजावटही करून लक्ष्मी आणि कुबेराचे पूजन या दिवशी केले जाते. घरातील संपत्ती, लॉकर सर्व खुले केले जातात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा केली जाते. तिच्यावर पाणी, हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.
आधीच्या काळात रात्री कुबेर पूजन करण्याची प्रथा होती. कुबेर हा खजिनदार आणि संपत्तीचा स्वामी मानला जातो. दीप प्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून पूजन हा मूळ संस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पण त्याला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेरा बरोबर लक्ष्मीची पूजा होऊ लागली. विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशान काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यामध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्यांची पत्नी इरीतीसह दाखवला आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्याची पत्नीची सुद्धा पूजा केली जात होती. कालांतराने इरीतीची जागा लक्ष्मी व कुबेरा जागी गणपतीला प्रतिष्ठित केले गेले.
लक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे तीच खरी या सणाची इष्टदेवता असल्याचेही म्हटले जाते. तिला जेष्ठा, षष्टी व सटवी, निऋत्ती या नावाने ओळखतात. निऋत्ती ही सिंधू संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून मान्य केले, तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे, असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गासप्तशती मध्ये आहे. हेच महत्त्व आपल्याला दिसून येते.
लक्ष्मीपूजन हे मोठ्या आनंदात व उत्साहाने करतात. लक्ष्मी पूजन करण्यामागे घरामध्ये धनसंपत्ती, ऐश्वर्य व आरोग्य सतत नांदत राहो व अज्ञानाचा नाश होवो अशी देवीला प्रार्थना करतात. लक्ष्मीपूजन दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी करत असतात. यामध्ये लक्ष्मीची पूजा करून घरासमोर सुशोभीत रांगोळी काढून दारी झेंडूच्या फुलांचे तोरण लावून फराळाला लाह्या, बत्तासे यांचा नैवेद्य दाखवून अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन साजरे केले जाते.
लक्ष्मीपूजन बाबत एक पौराणिक कथा प्रचलित आहे. जेथे स्वच्छता सौंदर्य आनंद उत्साह आहे किंवा सकारात्मकता आहे. तेथे लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. या दिवशी सायंकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. अनेक घरांमध्ये श्री सूक्तपाठ केले जाते. लक्ष्मीपूजनाच्या प्राचीन काळातील उपलब्ध असलेल्या संदर्भानुसार अगोदर रात्री कुबेर पूजन करण्याची पद्धत होती. कुबेर हा शिवाचा खजिनदार होता आणि धनसंपत्तीचा स्वामीसुद्धा मानला जातो.

संदर्भ: marathimol.com

आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी असे म्हणतात. दिवाळीच्या दिवसांतील हा एक सण आहे. या सणाशी संबंधित एक आख्यायिका प्रचलि...
31/10/2024

आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी असे म्हणतात. दिवाळीच्या दिवसांतील हा एक सण आहे. या सणाशी संबंधित एक आख्यायिका प्रचलित आहे. नरकासुर नावाच्या एका राजाने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व कुणाकडूनही वध होणार नाही - असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच मातांनी त्याला आलिंगन दिले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला.

महत्त्व:
आदल्या रात्री १२ वाजल्यापासूनच वातावरण दूषित लहरींनी युक्त असे बनू लागते; कारण या तिथीला ब्रह्मांडातील चंद्रनाडीचे सूर्यनाडीमध्ये स्थित्यंतर घडून येते. या स्थित्यंतराचा अपेक्षित असा लाभ पाताळातील वाईट शक्तींकडून उठवला जातो. पाताळातून प्रक्षेपित होणार्‍या नादयुक्त कंपन लहरी वातावरणात त्रासदायक अशा ध्वनीची निर्मिती करतात. या ध्वनीची निर्मिती लहरींतील रज-तमात्मक कणांच्या हालचालींतून उत्पन्न झालेल्या ऊर्जेतून केली जाते. या लहरी विस्फुटित लहरींशी संबंधित असतात. या लहरींतील ध्वनीकंपनांना आवर घालण्यासाठी पहाटेच्या वेळी अभ्यंगस्नान करून तुपाचे दिवे लावून दीपाची मनोभावे पूजा करतात. यामुळे दीपातून प्रक्षेपित होणार्‍या तेजतत्त्वात्मक लहरींच्या माध्यमातून वातावरणातील त्रासदायक लहरींतील रज-तम कणांचे विघटन केले जाते. या विघटनात्मक प्रक्रियेमुळे अनेक सूक्ष्म शक्तींच्या कोषांतील रज-तम कणही विरघळले जातात आणि वाईट शक्तींच्या भोवती असलेले संरक्षककवच नष्ट होण्यास साहाय्य होते. यालाच ‘आसुरी शक्तींचा वातावरणात दिपाच्या साहाय्याने झालेला संहार’ असे म्हणतात; म्हणून या दिवशी वाईट शक्तींचे निर्दालन करून पुढच्या शुभकार्याला दिपावलीच्या इतर दिवसांच्या माध्यमातून जिवाने आरंभ करावयाचा असतो. असुरांच्या संहाराचा दिवस, म्हणजेच एकप्रकारे नरकातील पृथ्वीवर अवतीर्ण झालेल्या वाईट लहरींच्या विघटनाचा दिवस म्हणून नरकचतुर्दशीला विशेष महत्त्व आहे.

संदर्भ : विकासपीडिया

धनतेरस, किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणू...
29/10/2024

धनतेरस, किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आहे.

धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात(यमलोकात) परततो. अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात.त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे.

धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रगट झाली.
त्याच वेळी समुद्रातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. म्हणून या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.

संदर्भ: विकिपीडिया

Address

410/1/305 Tangade Plaza, Near PIBM Hostel, Tangade Wasti, Paud Rd. , Bhugaon, Tal. Mulashi, Dist. Pune 412 115
Pune
412115

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 4:30pm

Telephone

+919730707579

Alerts

Be the first to know and let us send you an email when AKSHATA ENTERPRISES posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to AKSHATA ENTERPRISES:

Share