Healthy and Tasty Bites

Healthy and Tasty Bites yummy modak

04/09/2024
31/08/2024
22/06/2024

*अशी पाखरे येती...!!!*



(श्री अजय कटारिया सर यांना सादर समर्पित)

पुण्यामध्ये आप्पा बळवंत चौकाचं नाक जिथून सुरू होतं, तिथे चॉईस नावाचं पुस्तकाचे दुकान आहे. दुकानाच्या मालकांचे नाव आहे श्री अजय कटारिया.

बरोबर सहा वर्षांपूर्वी एका स्नेह्यांच्या माध्यमातून यांची आणि माझी ओळख झाली.

बोलता बोलता ते म्हणाले, 'माझे पुस्तकाचे दुकान आहे, कधी काही लागलं तर या...!'

भीक मागणाऱ्या अनाथ मुलांना आपण दत्तक घेऊन, त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. दरवर्षी मला खूप शैक्षणिक साहित्य लागतेच.

कटारिया साहेबांच्या चॉईस दुकानात गेलो; तर थोडी सूट मिळेल आणि चांगल्या क्वालिटीचे साहित्य मिळेल, हा स्वार्थी विचार करून मी त्यांना चार-पाच वर्षांपूर्वी प्रथमच, सर्व शैक्षणिक साहित्याची लिस्ट दिली.

त्यानंतर दोन दिवसांनी सर्व साहित्य आले.

बॉक्स उघडून पाहिला, आम्ही दिलेल्या लिस्टपेक्षाही सामान जास्त होते.

आम्ही एक वही मागितली तिथे पाच वह्या होत्या, एक दप्तर मागितले तेथे पाच दप्तरे होती, पाच कंपास पेट्या मागितल्या तिथे 25 होत्या...

मी त्यांना फोन करून म्हणालो, 'कटारिया साहेब, बहुतेक हा दुसऱ्यांचा बॉक्स आमच्याकडे आला आहे... हि आमची लिस्ट नव्हे !

ते हसून म्हणाले, 'असू द्या हो डॉक्टर, अनाथ पोरांना शिकवताय... थोडं इकडे तिकडे चालणारच... पोरं आहेत...

घ्या आमच्याकडून डोनेशन समजून...'

एक्स्ट्रा सामानाची मी त्यांना देणगी म्हणून पावती दिली, त्यांनी ती हसत खिशात ठेवली.

पुढच्या वर्षी म्हणजे साधारण 2021 ला त्यांना पुन्हा लिस्ट दिली... पुन्हा पाचपट सामान जास्त होते... मी पुन्हा तोच फोन केला... पुन्हा त्यांचे तेच उत्तर आले... एक्स्ट्रा सामानाची मी त्यांना पुन्हा पावती दिली... ही पावती हसत त्यांनी पुन्हा खिशात ठेवली...!

एकावर एक फ्री... हि बिझनेस स्ट्रॅटेजी मी समजू शकतो, पण एकावर पाच फ्री... ???

मग 2022 साल उजाडले...

यावेळी सामानाची लिस्ट घेऊन मी स्वतः दुकानात गेलो. दुकानात भरपूर कर्मचारी आहेत, परंतु माझ्याकडची लिस्ट घेऊन त्यांनी स्वतः सामान बांधायला सुरुवात केली.

मी बारकाईने पाहत होतो, माझ्या लिस्ट पेक्षा पाचपटीने जास्त गोष्टी ते स्वतःच्या हाताने बॉक्समध्ये भरत होते.

मी त्यांना म्हणालो साहेब, आपण आपले नुकसान का करून घेता ? माझ्या लिस्ट प्रमाणेच मला सामान द्या...

यावर ते माझ्याकडे न बघता, स्टूल घेऊन, वरच्या कप्प्यातले सामान काढता काढता म्हणाले, 'डॉक्टर भरगच्च भरलेल्या ताटामधून दोन घास चिमण्यांना टाकले म्हणजे आपलं काही नुकसान होत नाही हो ...!

ए त्या चौथा कप्प्यातला, नवीन माल काढ... त्यांचं सगळं लक्ष बॉक्स भरण्याकडे....

तरीही मी माझं बोलणं रेटत म्हणालो, पण हा आपला व्यवसाय आहे साहेब, मला साहित्य देणे म्हणजे आपला तोटा आहे ...! मी आवंढा गिळत म्हणालो.

तितक्याच उत्स्फूर्तपणे बॉक्समध्ये साहित्य टाकत ते म्हणाले, 'साहेब धंदा म्हणा, व्यवसाय म्हणा, कारभार म्हणा, कारोबार म्हणा.... जे काही करायचं ते नफ्यासाठी... मी पक्का व्यापारी आहे, तोट्यामध्ये कधीच व्यापार नाही केला मी ...

'आत्ता बी मी तोट्यामंदी नाहीच, नफ्यामंदीच आहे...' चष्म्या मागून डोळे मिचकावत ते बोलले.

मागितलेल्या गोष्टीपेक्षा, पाचपटीने भरलेल्या बॉक्स कडे बघत ' हे कसं काय बुवा ?' हा प्रश्न मला त्यांना विचारायचा होता...

माझ्या बावळट चेहऱ्यावर त्यांना तो दिसला असावा... !

'छोटू, आपल्याकडच्या दुरेघी वह्या संपल्या का रे ? शेजारच्या दुकानातून दहा डझन मागव आणि घाल या बॉक्समध्ये.... !' हात झटकत ते बोलले.

माझा बावळट चेहरा अजून तसाच असावा.

नफा तोट्याचा त्यांनी मग उलगडा केला...

'डॉक्टर तुमी कितीबी नाय म्हणले तरी जास्तीचा सामान पाहून तुम्हाला आनंद होतो का नाही ? तो माझा नफा....

दहा पोरं नाही, आता तुम्ही 50 पोरांना सामान देऊ शकता, त्या पोरांना आनंद होतो की नाही...? तो माझा नफा...

कटारिया काका कोण ? हे पोरांना कधीच कळणार नाही... पण 50 पोरं शिकत आहेत, याचा मला आनंद होणार का नाही ? तोच माझा नफा...

जलमाला येऊन आपण कोणाच्या उपयोगी नाही पडलो, हा खरा तोटा... !

"तोटा" या शब्दावर जोर देत , डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताने त्यांनी जोरात टाळी मारली...!

आपून तोट्यात धंदाच करत नाही सायेब, पक्का व्यापारी आहे मी ...'

काउंटर वरच्या टेबलावर बोटांनी तबला वाजवत ते म्हणाले, 'ए चाय सांगा रे डॉक्टरला...!'

तोट्याची शेती करून, आनंदाची बाग फुलवत; नफ्याची फुलं वेचणाऱ्या या माणसापुढे मी मनोमन नतमस्तक झालो !

चहाचा घोट घेऊन मी त्यांना म्हणालो, 'सर पण हे नुकसान किती आहे तुमचं, यात विनाकारण खर्च खूप आहे...'

ते पुन्हा हसत म्हणाले, 'डॉक्टर पोरगं तुमचं असो, माझं असो किंवा आणखी कोणाचं असो, पोराच्या शिक्षणावर झालेला खर्च मी खर्च समजतच नाही, *पोरांच्या शिक्षणासाठी केलेला खर्च हा भविष्यामध्ये भरभक्कम परतावा देणारी गुंतवणूक असते*

गोरगरिबांची पोरं शिकतील तोच माझा परतावा... मंग खर्च झालाच कुठे ?

आलतू फालतू स्कीम मध्ये अपुन पैसा गुतवतच नाही... सांगितलं ना ? पक्का व्यापारी आहे मी... !

मी खर्च केला नाही सायबा... फक्त गुंतवणूक केली... माझ्या पोरांवर गुंतवणूक केली... बघा भरभक्कम परतावा येणारच...

"येणारच" म्हणताना पुन्हा डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताने त्यांनी जोरात टाळी मारली...!

मी भारावून म्हणालो या अनाथ मुलांसाठी तुम्ही किती करत आहात... ?

अनाथ कशानं हो... पालक म्हणून तुम्ही आहे... मी आहे.... काय डॉक्टर तुम्ही सुद्धा...!

'चहा संपवा तो...' म्हणत, टेबलावर पुन्हा त्यांनी हसत तबला वाजवला...

तो तबला होता ? की माझ्या हृदयाची धडधड ?? माझं मलाच कळलं नाही...!

शर्टाच्या बाहीला डोळे पुसत कटारिया साहेबांची नजर चुकवत मी बाहेर पडलो !

सर्व साहित्य घेऊन मी आलो... दहा ऐवजी 50 मुलांना ते वाटले... तरीही कुठेतरी अपराधीपणाची भावना होती.

भावनेच्या भरात हा "वेडा माणूस" स्वतःचं खूप नुकसान करून घेत आहे, याची मला मनोमन जाणीव होती.

याच प्रेमाच्या भावनेतून, 2023 साली मी यांच्याकडे ऑर्डर दिली नाही, आप्पा बळवंत चौकातील दुसऱ्या एका नामांकित दुकानातून मी साहित्य विकत घेण्यासाठी ऑर्डर दिली.

लिस्ट नीट लिहून आणायची, अक्षर तुमचं तुम्हाला तरी कळतंय का ? बाजूला थांबा जरा, बाकीची गिऱ्हाईकं बघू देत ... वेळ किती लागेल म्हणून काय विचारता ? इतकं एकच काम आहे का ? सामान काय आहे ते आत्ताच मोजून घ्या, पुन्हा कटकट करायची नाही...
ए यांना मराठी भाषा कळत नाही, दुसऱ्या भाषेत सांग रे यांना जरा.... असा स्वतःचा पाणउतारा करून घेतला...

यानंतर कॅरीबॅगचे सुट्टे पैसे देईपर्यंत आमच्या वस्तूंना त्यांनी आम्हाला हात सुद्धा लावू दिला नाही... !

हरकत नाही... जगात सगळेच कटारिया साहेब जन्माला आले तर मग अनुभव कसा मिळणार ?

असो... हा प्रकार पुढे कटारिया साहेबांना कसा कोण जाणे पण कळला

एके दिवशी शंकर महाराज मठाजवळ भीक मागणाऱ्या लोकांना मी तपासत असताना ते तावातावाने आले.

चेहऱ्यावरचा मृदुभाव आणि ओठांवरची मृदू वाणी यावेळी लुप्त झाली होती.

'डॉक्टर तुम्ही स्वतःला समजता काय ? सेवा करण्याचा मक्ता काय तुम्हीच घेतला आहात का ? थोडीफार सेवा आम्ही करत होतो, आमच्या हातून हि सेवा काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?'

*सेवा करणे हा माझा अधिकार आहे आणि तो तुम्ही माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.*

मी तुम्हाला माफ नाही करणार...

ते रागानं थरथर कापत बोलत होते...

या जमदग्नीपुढे मी नतमस्तक झालो... पायावर डोकं टेकवलं... आणि त्यांच्या प्रेमाचा राग माझ्या झोळीत मनसोक्त भरून घेतला !

तुम्हाला ऑर्डर न देण्यामागे माझी पण काय भावना आहे, हे सर्व मी त्यांना उलगडून सांगितले, क्षणात या जमदग्नीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले... !

स्वतःचे अधिकार मिळवण्यासाठी लोक आंदोलन, उपोषण, रास्ता रोको करतात... सेवा करण्याचा अधिकार मिळवण्यासाठी हा माणूस आज माझ्याशी... माझ्याशी ??? भांडला... !!!

यानंतर पुढे दोन-तीन वेळा मोघम भेटी झाल्या.

आता साल उजाडले 2024.

यावर्षीची शैक्षणिक ऑर्डर "चॉईस" मध्ये देण्याशिवाय मला दुसरा कोणताही "चॉईस" नव्हता...!

मी 13 जून 2024 ला कटारिया साहेबांच्या फोनवर फोन केला. पलीकडून आवाज आला हॅलो मी चिराग बोलतोय... !

चिराग हे कटारिया साहेबांचे सुपुत्र, चार्टर्ड अकाउंटंट आहेत !

' हॅलो चिराग सर, कटारिया साहेब कुठे गेले त्यांना फोन द्या ना..'

'सर बाबा गेले' पलीकडून मंद आवाज आला.

आमचा हा माणूस कोणालातरी मदत करण्यासाठी, कोणाच्यातरी पाठी धावतच असतो, सतत फिरत असतो, हे मला माहित होतं. त्याच भावनेने मी बोललो...

'अच्छा गेले का ? बरं पुन्हा कधी येतील ?' मी हसत बोललो.

'बाबा गेले सर... परत ते पुन्हा कधीही येणार नाहीत ... तुम्हाला माहित नाही ?'

माझ्या पायाखालची जमीन सरकली... मी सुन्न झालो... मी काय ऐकतोय यावर माझा विश्वास बसेना...

भानावर आलो, तेव्हा मात्र या माणसाची मला भयंकर चीड आली...

पलीकडच्या चौकात जाताना सुद्धा घरात आपण सांगून जातो... मग इतक्या मोठ्या प्रवासाला जाताना साधं आम्हाला सांगण्याची, निरोप घेण्याची सुद्धा तुम्हाला गरज वाटली नाही ?

भांडून सेवेचे अधिकार मागता आणि असं बेजबाबदारपणे सोडून जाता ?

आमच्या पोरांना पोरकं करून जाण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?

हे...हे... असं... काउंटरवर तबला वाजवत आम्हाला आशा का दाखवलीत ?

कटारिया साहेब, आता मी सुध्दा तुम्हाला माफ नाही करणार...!

'सर काही काम होतं का ?' फोन अजून चालूच होता, पलीकडून चिराग सरांचा आवाज आला.

'शैक्षणिक साहित्याची ऑर्डर द्यायची होती...' मी शांतपणे बोललो.

'ठीक आहे सर, दोन दिवसात पाठवतो.' तितक्याच शांतपणे उत्तर आले.

दोन दिवसांनी सामान आले, मी बॉक्स खोलले.

आम्ही एक वही मागितली तिथे पाच वह्या होत्या, एक दप्तर मागितले तेथे पाच दप्तरे होते, पाच कंपास पेट्या मागितल्या तिथे 25 होत्या...

मी चिराग सरांना फोन केला, म्हणालो, 'चिराग सर, बहुतेक हा दुसऱ्यांचा बॉक्स आमच्याकडे आला आहे... हि आमची लिस्ट नव्हे, काहीतरी चूक झाली असावी !

चिराग सर म्हणाले, 'सर मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, आकड्यांच्या खेळात मी चुकत नाही, तुम्ही दिलेले सामान मी अत्यंत काटेकोरपणे मोजून मापून स्वतःच्या हाताने बॉक्समध्ये भरलं आहे, चूक होणार नाही माझी...!'

'अहो पण, चिराग सर... एका वस्तूच्या बदल्यात पाच पाच वस्तू आल्या आहेत आम्हाला...'

*'अच्छा... हां... हां.... त्या एक्स्ट्रा वस्तू का ? त्या मी नाही... बाबांनी पाठवल्या असतील कदाचित सर ...'*

फोन कट झाला ...!!!

इतका वेळ धरून ठेवलेला बांध आता फुटून गेला... !

कटारिया साहेब चिरंतन प्रवासाला निघून गेले...

पण जाताना आपल्या विचारांची एक पणती मागे ठेवून गेले.

या पणतीला नाव सुद्धा काय दिलं आहे... ? चिराग... व्वा...!!!

यानंतर 15 जून 2024 ला सर्व चिल्ल्यापिल्लांना बोलावून शैक्षणिक साहित्य दिले.

नवीन वही, नवीन पुस्तक, नवीन दप्तर, नवीन कंपास पेटी पाहून या सर्व चिमण्या आनंदाने चिवचिवल्या... !

या चिवचिवणाऱ्या चिमण्यांना आता कोणत्या तोंडाने सांगू ....

बाळांनो, आज खऱ्या अर्थानं तुम्ही पोरके झालात रे....

आणि तुमच्या बरोबर मी सुद्धा... !!!

21 जून 2024

*डॉ अभिजीत सोनवणे*
*डॉक्टर फॉर बेगर्स*
*सोहम ट्रस्ट पुणे*
*9822267357*
*[email protected]*

खूप खूप धन्यवाद ! आमच्या बाप्पा फेवरेट उकडीच्या मोदकांना अगदी भरभरून मनापासून प्रतिसाद दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापा...
29/09/2023

खूप खूप धन्यवाद !
आमच्या बाप्पा फेवरेट उकडीच्या मोदकांना अगदी भरभरून मनापासून प्रतिसाद दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार !!!

*Ganesh festival offer* ⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️😋😋😋😋😋🤩🥳🥳Didn't eat Ukadiche modak till now in this Ganesh festival season ? so gra...
20/09/2023

*Ganesh festival offer*
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
😋😋😋😋😋🤩🥳🥳

Didn't eat Ukadiche modak till now in this Ganesh festival season ? so grab this opportunity and order the Pune's famous mouth watering dish and Ganpati Bappa's most favourite dish from Healthy and Tasty Bites.

😋😋😋😋😋😋😋

Book your orders for this Ganesh Festival

**Ganpati special* 😍
*उकडीचे मोदक ऑर्डर प्रमाणे फ्रेश करून मिळतील.
* मोल्ड केसर मोदक ₹ 30/-
* मोल्ड ड्रायफ्रूट्स मोदक ₹ 35/-
* हात वळणीचे उकडीचे मोदक केशरसह ₹ 35/-
* हात वळणीचे उकडीचे मोदक केशर विथ ड्रायफ्रूट्स ₹ 40/-
*

*मोदक- 11,21,51,101* अशी ऑर्डर स्विकारली जाईल. 🤗
बुकिंग चालू

For order contact
Mrs. Vaishali Gawade Mob. 8208841602

We are providing Fresh Authentic and Hygienic Homemade Ukdiche Modak.

(Home delivery charges extra)
Delivery - By Dunzo

*Ganesh festival offer* ⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️😋😋😋😋😋🤩🥳🥳Didn't eat Ukadiche modak till now in this Ganesh festival season ? so gra...
12/09/2023

*Ganesh festival offer*
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
😋😋😋😋😋🤩🥳🥳

Didn't eat Ukadiche modak till now in this Ganesh festival season ? so grab this opportunity and order the Pune's famous mouth watering dish and Ganpati Bappa's most favourite dish from Healthy and Tasty Bites.

😋😋😋😋😋😋😋

Book your orders for this Ganesh Festival

**Ganpati special* 😍
*उकडीचे मोदक ऑर्डर प्रमाणे फ्रेश करून मिळतील.
मोल्ड केसर मोदक ₹ 30/-
मोल्ड ड्रायफ्रूट्स मोदक ₹ 35/-
हात वळणीचे उकडीचे मोदक केशरसह ₹ 35/-
हात वळणीचे उकडीचे मोदक केशर विथ ड्रायफ्रूट्स ₹ 40/-
*
*साच्यातला मोदक हातवळणीच्या मोदक पेक्षा थोडा लहान आहे*

*मोदक- 11,21,51,101* अशी ऑर्डर स्विकारली जाईल. 🤗
बुकिंग चालू

For order contact
Mrs. Vaishali Gawade Mob. 8208841602

We are providing Fresh Authentic and Hygienic Homemade Ukdiche Modak.

(Home delivery charges extra)
Delivery - By Dunzo

Address

Kharadi Road, Kharadi
Pune
411014

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm

Telephone

+918208841602

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Healthy and Tasty Bites posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share