Kashvi Recipe

Kashvi Recipe Here you get various delicious and easy Authentic Maharashtrian Recipes, and tips about cooking,

नमस्कार मित्रांनो,
तुम्हा सर्वांचे या काश्वी रेसिपी मराठी पेज मध्ये मनःपूर्वक स्वागत.
काश्वी रेसिपी पेज वर आपण आपल्या प्रिय मराठी पाककृतींचा स्वाद घेऊ शकता. त्यात मोदक, वडा पाव, मिसळ पाव, कांदा पोहे, शिरा, दिवाळीचे मिठाई, उपवासाचे अन्न, गणपती-गौरीचे नैवेद्य आणि अनेक काही समाविष्ट आहे. आपल्या सहकार्य आणि प्रतिक्रिया हे आम्हाला पुढे प्रगती करण्यास आणि प्रेरित करण्यास मदत करतील. म्हणून हा पेज ला Follow करा.

07/02/2026

#व्हॅलेंटाईन


Kashvi Recipe
Comment for any recipe you want

06/02/2026

ओल्या हरभऱ्याची चवदार मसालेदार भाजी - पारंपारिक ग्रीन ग्राम करी मराठी रेसिपी
ओल्या हरभऱ्याची खास रेसिपी
आज आपण पाहणार आहोत ओल्या हरभऱ्याचा खमंग आणि चविष्ट मसाला 😋
ही रेसिपी खूप सोपी असून घरच्या घरी उपलब्ध साहित्याने बनते.
🥗 साहित्य :
१) ३ - कांदे
२) २ - टोमॅटो
३) १०/१२ - लसूण पाकळ्या
४) इंच आलं
५) अर्धी वाटी कोथिंबीर
६) ८/१० भिजवलेले बदाम
७) १ वाटी ओले हरभऱ्याचे दाणे .
८) २ चमचा लाल तिखट
९) १ चनचा गरम मसाला
१० ) चवीनुसार मीठ
कृती :- व्हिडीओ मध्ये दाखविल्या प्रमाणे .
ही ओल्या हरभऱ्याची मसालेदार भाजी / आमटी भाकरी, चपाती किंवा भातासोबत अप्रतिम लागते 🤍
जर तुम्हाला रेसिपी आवडली तर Like 👍 | Share 🔁 | Subscribe 🔔 करायला विसरू नका.
#ओल्या_हरभऱ्याची_भाजी #ओल्या_हरभऱ्याचा_मसाला





#हरेचणेकिसब्जी
#हरेचने #चणे #चणेकीसब्जी Kashvi Recipe

केळीचे उपवासाचे कुरकुरीत काप महाशिवरात्री स्पेशल, रेसिपी लवकरच   #केळ्याचेकाप    #उपवासस्पेशल  #उपवास  #महाशिवरात्री
06/02/2026

केळीचे उपवासाचे कुरकुरीत काप महाशिवरात्री स्पेशल, रेसिपी लवकरच #केळ्याचेकाप #उपवासस्पेशल #उपवास #महाशिवरात्री

05/02/2026

सातारा स्पेशल अस्सल काळ्या घेवड्याची आमटी
साहित्य :-
१) काळ्या घेवड्याची डाळ - १ वाटी
२) खोबऱ्याचा तुकडा
३) लसुण पाकळ्या - ८ ते १०
४) कांदा लसूण मसाला - २ चमचे
५) लाल मिरची पावडर - २ चमचे
६) हळद पावडर - १ चमचा
७) मीठ - चवीनुसार
८) कोथिंबीर
◆ फोडणी साठी
१) तेल - २ पळी
२) जिर - १ लहान चमचा
३) हिंग - चिमूटभर
४) कढीपत्ता पाने
कृती :-
१) काळ्या घेवड्याची डाळ २/३ वेळा छान धुवून घ्यावी
कुकर मध्ये डाळ टाकून त्यात १ इंच वर येईल इतके पाणी टाकावे, थोडं तेल टाकून कुकरला ५/ ६ शिट्ट्या करून घ्याव्यात .
२) दुसरीकडे खलबत्त्यात किंवा मिक्सर च्या भांड्या मध्ये खोबरे लसूण टाकून ठेचुन घ्यावे किंवा बारीक करावे. डाळ शिजली असेल तर गॅस बंद करावा डाळ रवीच्या सहाय्याने घोटून घ्यावी.
३) गॅस वर कढई ठेवून त्यात तेल टाकावे तेल गरम झाले की हिंग, जिर, कढीपत्या ची फोडणी द्यावी, तयार लसूण खोबऱ्याच वाटण टाकावे, वाटण छान परतल गेलं की त्यात उकळून घोटून घेतलेली डाळ टाकावी गरजे नुसार गरम पाणी टाकून आमटीला एक उकळी येऊ द्या.
४) आमटीला एक उकळी आली की वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व गॅस बंद करावा . तयार आहे अस्सल सातारा स्पेशल काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी .
गरम गरम ज्वारीच्या भाकरी सोबत किंवा भाता सोबत सर्व्ह करा.
Kashvi Recipe #काळ्याघेवड्याचीआमटी #मराठीरेसिपी #साताऱ्याचीखास #सातारा_स्पेशल #महाराष्ट्रीयनजेवण #देशीचव #घरगुतीजेवण #मराठीरेसिपी #मराठीफूड

04/02/2026

Experience the Unique Taste of Pineapple Tandoori Fry
#अननसतवाफ्राय #अननसफ्राय
Pineapple Tawa Fry Recipe :
आंबट, गोड चवीचं तवा फ्राय अननस
अननसाची भन्नाट अशी रेसिपी
साहित्य :-
१) अननसाच्या स्लाईस ७/८
२) लाल तिखट - १ चमचा
३) हळद - अर्धा चमचा
४) साखर - अर्धा चमचा
५) चाट मसाला - अर्धा चमचा
६) पेरी पेरी मसाला - अर्धा चमचा
७) मीठ- चवीसुसार
८) लिंबाचा रस -
९) तेल - आवश्यकतेनुसार
कृती :-
१) अननसाच्या स्लाईस करून घ्याव्यात व त्यातला मधला कडक भाग काढून घ्यावा.
२) एका प्लेट मध्ये हळद, लाल तिखट, मीठ, चाट मसाला, पेरी पेरी मसाला,साखर लिंबाचा रस आणि एक लहान चमचा तेल घालावे.
३) आता सर्व मिश्रण मिक्स करून हे मिश्रण अननसाच्या स्लाईस वर व्यवस्थित लावून घ्या. मिश्रण स्लाईस ला व्यवस्थित लावून झाल्या नंतर मॅरीनेट केलेले अननस अर्धा ते पाऊण तासा साठी झाकून ठेवा.
४) अर्धा ते पाऊण तासात नंतर एका पॅनमध्ये तेल घ्या.
तेल गरम झाल्यावर अननसाचे स्लाईस २/३ मिनिटं एका बाजूने व २/३ मिनिटं दुसऱ्या बाजूने शॅलो फ्राय करून घ्यावेत. सर्वात शेवटी यात थोडं बटर टाकावे म्हणजे छान असा बटरी फ्लेवर येतो. व गॅस बंद करावा.

५) तर अशा पद्धतीने तयार झाले आहे तवा फ्राय अननस.

#अननसतवाफ्राय #अननसफ्राय

03/02/2026

Butter Garlic Pasta

Detail Recipe in caption
बटर गार्लिक पास्ता
Healthy Easy kids tiffin recipe
pasta​
साहित्य :-
१) बॉईल पास्ता
२) बटर
३) क्रश केलेला लसुण पाकळ्या
४) एक मिडीयम साईज कांदा बारीक चिरलेला
५) स्वीट कॉर्न दाणे
६) चिली फ्लेक्स
७) ऑरीगॅनो
८) क्रिम चीज
९) मीठ
१०) कोथिंबीर
कृती :-
१) सर्वात अगोदर पास्ता ९०% बॉईल करून घ्यावा, नंतर एका पॅन मध्ये १ लहान चमचा तेल टाकून त्यात बटर टाकावे, बटर मेल्ट झाले की क्रश केलेल्या लसूण पाकळ्या टाका लसूण थोडा गोल्डन ब्राऊन झाला की त्यात कांदा टाका, २ मिनिटं हाय फ्लेम वर कांदा परतवून झाला स्वीट कॉर्न चे दाणे टाकून परतवून घ्या मग यात बॉईल केलेला पास्ता टाकून छान मिक्स करा.
२) पास्ता टाकल्या नंतर चिली फ्लेक्स व ऑरीगॅनो अन चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा, नंतर यात १/२ चमचा क्रिम चीज टाकून छान क्रिमी टेक्चर आले की बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व गॅस बंद करावा तयार आहे आपला बटर गार्लिक पास्ता .

buttergarlic​ buttergarlicpasta​ पास्ता​ instantrecipe​ recipe​ cooking​ टिफिनरेसिपी​ kidstiffinrecipe​ eveningsnacks​ jhatpatrecipe

02/02/2026

Viral Biscoff Biscuit Cheese Cake

साहित्य :-
१) ग्रीक योगर्ट
२) बिस्कऑफ बिस्कीट
३) मिल्कमेड
कृती :-
१) एका बाऊल मध्ये ग्रीक योगर्ट घेऊन त्यात १/२ चमचे मिल्कमेड टाकुन ते छान मिक्स करून त्याच एक स्मुद अस मिश्रण तयार करा .
२) आता एका जार मध्ये हे तयार मिश्रण टाकून त्यात व्हिडीओ मध्ये दाखविल्या प्रमाणे बिस्कीट च्या लेयर्स लावा वरून अजून थोडे मिश्रण टाकून जार चे झाकण लावून फ्रिजर मध्ये ४/५ तासासाठी ठेवून दया.
३) ४/५ तासा नंतर तुम्ही बघु शकता आपला चीज केक खाण्या साठी तयार आहे, आपल्या मुलांन सोबत केक एन्जॉय करा.
केक viralcheesecake recipe viralrecipe biscoffcake biscuit biscoff biscoffcheesecake instantrecipe instantcake greekyogurt milkmaid

11/01/2026

मकरसंक्रांत स्पेशल झटपट तयार होणारे तिळाचेलाडु #तिळाचेलाडू #तीळ_गुळ_घ्या_गोड_गोड_बोला
मकरसंक्रांत स्पेशल झटपट पटापट बनणारे तिळाचे लाडु
साहित्य :-
१) एक वाटी तीळ
२) अर्धी वाटी शेंगदाणे
३) एक वाटी गूळ
४) २ चमचे साजुक तूप
५) एक लहान चमचा वेलची पावडर
कृती :--
व्हिडीओ मध्ये दाखवील्या प्रमाणे
#तिळाचेलाडू #मकरसंक्रांत #तीळ #तीलकेलड्डू #तिळाचीवडी

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kashvi Recipe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share