Sami's cookbook

  • Home
  • Sami's cookbook

Sami's cookbook cook book is the online recipe, cooking, culinary travel, and food news source. Discover great reci

दम आलू
15/12/2022

दम आलू

ChuttiWali Chaay
21/10/2022

Chutti
Wali
Chaay

26/01/2022

Roll roll

Suralichi vadi
26/01/2022

Suralichi vadi

23/01/2022

Join my clothing store online

it's a online sale platform of

  काही भाज्या अन वेगळ्या पद्धतीने करणे हे त्या त्या ऋतु मधेच छान लागततशीच ही पिठाची वांगी काळी कुळकुळीत वांगी मिळतात ना ...
23/01/2022


काही भाज्या अन वेगळ्या पद्धतीने करणे हे त्या त्या ऋतु मधेच छान लागत
तशीच ही
पिठाची वांगी

काळी कुळकुळीत वांगी मिळतात ना सध्या ती ताजी असतानाच ही भाजी करायची ।.फ्रिज मध्ये ठेऊन नाही , जरा शिजायला त्रास होतो

5 ते 7 काळी वांगी , नारळाचं चव, लसूण, कोथिंबीर बारीक चिरून, मीठ तिखट अन डाळीचं पीठ ,तेल एवढाच काय ते साहित्य

ह्यातला मसाला चा महत्वाचा आहे
नारळाचा चव साधारण 1 वाटी त्यात डाळीचं पीठ तिखट मीठ अन 10 ते 12 पाकळ्या बारीक वाटलेला लसूण , थोडी कोथिंबीर हे सगळं आधी कोरडा एकत्र करून घ्यायचा
मग हळू हळू त्यात तेल टाकत एकत्र करायचा आता इथे खरा कास आहे ह्या पिठाच्या मसाल्याचा अजिबात गोळा गिकच होता कामा नये, म्हणून हळू हळू तेल टाकत भुरभुरीत बनवाट जायचा , म्हणजे फोटो मध्ये दिलाय तास मोकळा
आता हे पीठ मसाला वांग्यात भरायचा अन जर जास्त तेलावर नुसत्या वाफेवर वांगी शिजवायची .1 थेंब पाणी न घालता अगदी मंद आचेवर ही आरामात 10 मिन मध्ये शिजतात

टीप - हे same रेसिपी भरली पडवळ पण करता येतात अतिशय जबरदस्त लागतात

अजून एक टीप -पहिल्या वाफेची वांगी मस्त तांदळाच्या भाकरी बरोबर खाऊन तर पहा ...

Kadak thandi an kadak misal
23/01/2022

Kadak thandi an kadak misal

दही मिरचीतेल लावून हिरव्या तिखट  मिरच्या गॅस वर भाजायच्या , वाटीत बारीक चिरलेली कोथिंबीर , काळ मीठ , अन भाजलेल्या मिरच्य...
23/09/2020

दही मिरची
तेल लावून हिरव्या तिखट मिरच्या गॅस वर भाजायच्या , वाटीत बारीक चिरलेली कोथिंबीर , काळ मीठ , अन भाजलेल्या मिरच्या हातानी कुस्करून घाययचा, त्यात सरसरीत केलेल दही घालायाच , अन छान फेटून घ्यायच
सणावाराला पण ही डावी बाजू म्हणून चालेल..

कैरी भातही रेसिपी  आपल्या चविनुसार अन अंदाजाने करायची आहे पाहिले भात शिजवून थंड करायचा  मोकळा करून ताटात पसरवायांचा  मग ...
12/05/2020

कैरी भात
ही रेसिपी आपल्या चविनुसार अन अंदाजाने करायची आहे
पाहिले भात शिजवून थंड करायचा मोकळा करून ताटात पसरवायांचा मग त्यात आपल्याकडे असलेली कैरी किती आंबट आहे , आपल्याला किती आंबट आवडत त्या प्रमाणात कैरी किसून भातावर टाकायची मीठ साखर टाकून हे सगळं मिश्रण करून घ्याच
आता तेलात मध्ये शेंगदाणे ,डाळ्या, काजू टाळून घेऊन भातावर टाकायचे
मग त्याच उरलेल्या तेलात मोहरी जिर अन जर जास्त हिंगअन लाल मिरची घालून फोडणी करायची अन भातावर ती टाकायची । हा भात परतून करायचा नाही
आंबट गोड तिखट छान लागतो सोबत लावलेले पोहे खायला असतील तर अजून चा मजा ...कैरी संपत आलीये लवकर करून पाहा

ज्वारी चे फुलके ज्वारी ची भाकरी  करण तस सोप्पं नाहीये , नवीन मुलींना ज्यांना भाकरी जमत नाही त्यांना हा सोपा प्रकार ज्वार...
07/05/2020

ज्वारी चे फुलके
ज्वारी ची भाकरी करण तस सोप्पं नाहीये , नवीन मुलींना ज्यांना भाकरी जमत नाही त्यांना हा सोपा प्रकार
ज्वारीचं पीठ 2 वाट्या असेल तर 1 मूठभर तांदळाचं पीठ घालून गरम पाण्याची उकड काढून झाकण ठेवून द्याच,
ते सगळं कोमट झालं की छान मळून घ्याच,अन साधे फुलके करतो तसे फुलके करायचे
झटपट अन हलके सोप्पे

उन्हाळ्यात पालेभाजी कमी मिळते न पाहुणे रावळे खूप  ,आणली एक जुडी की सर्वाना पुरेल अशी मस्त चमचमीत मुद्धा भाजी मी पालकाची ...
04/05/2020

उन्हाळ्यात पालेभाजी कमी मिळते न पाहुणे रावळे खूप ,आणली एक जुडी की सर्वाना पुरेल अशी मस्त चमचमीत मुद्धा भाजी
मी पालकाची केलीये तुम्ही मेथी , अळू किंवा काही मिक्स पालेभाज्यांचा करू शकता.

अजून एक खुलासा इथे करायचा आहे

** जशी दर 12 कोसाला भाषा बदलते तस प्रत्येक पदार्थ करण्याची कृती देखील जे धान्य जिथे उगवत तस थोडं थोडं बदलत जात, ज्या मला काही माहिती आहेत अन जास्त कुणाला माहीत नाहीत अशा रेसिपी मी देण्याचा प्रयत्न करेन


पालकाची मुद्दा भाजी
एक जुडी पालक, 1 टोमॅटो , 1 वाटी तूरडाळ अन अर्धी वाटी चणाडाळ मूठभर शेंगदाणे हे सगळं कुकर ला 2 शिट्या करून वाफवून घ्यायच ,
कढई मध्ये हळद जिर मोहरी हिंग याची थोड्या तेलात फोडणी करून त्यात उकडलेले सगळा पालक गोळा टाकायचा जर उकळी आली की लाल मिरची अन एक अख्खा सोललेले लसूण तळून वरून चरचरीत फोडणी द्यायची ही झाली मुद्दा भाजी

Address

Pune

411011

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sami's cookbook posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sami's cookbook:

  • Want your business to be the top-listed Food & Beverage Service?

Share