17/10/2025
वसुबारस च्या "NITI FARMS" येथून सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा....
जशी हवी देशी गाय...
तसाच लागतो देशी Bull.....
देशी गोवंश टिकवायचा तर....
त्याच्याकडे पण लक्ष द्यावेच लागते खूप....
जसं गायीचं दूध पौष्टिक...
तसंच तीचं तूप ....
जितकं तूप जुनं.....
त्याचं औषधी महत्त्व वाढतं खूप खूप...
देशी वंशावळीचं गोमूत्र आणि शेण.....
यांची किंमत जाणायला लागलय सारं जग....
स्वदेशीचा बोलबाला....
द्यावं प्रत्येकानी देशी गोवंशाच्या महत्त्वाकडे जरूर लक्ष....
Health is Wealth....
जाणतो आपण सारे....
देशी गाईचं तूप का महाग ???
हा प्रश्न गोपालकाला विचारण्याआधी करावी आकडेमोड.....उत्तर मिळेल तुम्हाला थेट....
दुधाचं दही.... दह्याचे रवीनी घुसळून ताक....ताकावरचे लोणी कढवून तूप काढणे......ही आयुर्वेदिक दृष्ट्या योग्य पद्धत....हीलाच "बिलोना" म्हणतात....
या पद्धतीने एक किलो तूप काढण्यासाठी गिर गायीचं ३० लिटर दूध लागतं .....
मग सांगा बरं मंडळी .....काय दराने विकावे शेतकऱ्यांनी ....अर्थातच नफा पकडून हे तूप ???
गोठा.....गोपालन हे असतं गोपालक आणि शेतकऱ्याचं उत्पन्नाचं मुख्य साधन.....
भेसळमुक्त दूध आणि तूप द्यायचं... हे जर असेल त्याचं व्रत....
"समाजसेवा" करतो तो गोपालक....करतो जो दूधासारखा पांढरा शुभ्र व्यवहार(हे फक्त म्हणायला बरं का मंडळी).......देशी गायीचं दूध पिवळसर रंगाचंच...
भेसळमुक्त देशी गायीचं दूध आणि तूप .... हा व्यवसाय झालाय खर्चिक खूप.....
मंडळी.....
काढावा दुधाच्या दराचा आणि तुपाच्या दराचा हिशोब तुम्ही...आणि मग ५००-१००० रुपये किलो दराने मिळणारं तूप हे येतं कुठून आणि कसे ???
काय असते त्याची गुणवत्ता ??
हे सुज्ञास वेगळे सांगणं न लगं.....
वसूबारस या एका दिवशी गोवंशाची पूजा करून पुण्य मिळवतात सकल जन....
पण....वर्षभर.....३६५ दिवस जो गोपालक यांची काळजी घेतो....जपतो.....तुम्हाला पौष्टिक खायला-प्यायला देतो...त्याच्याकडे मात्र करू नका तुम्ही दुर्लक्ष....
शेतकरी तितिक्षा
शुक्रवार १७ ऑक्टोबर २०२५