AgroVriksh

AgroVriksh AgroVriksh – आपका अपना कृषि परिवार �
हम यहाँ साझा करते हैं खेती-बाड़ी, ऑर्गेनिक फार्मिंग, नई कृषि तक

24/01/2026
खरबूज plot 60 दिवस
24/01/2026

खरबूज plot 60 दिवस

12/01/2026
12/12/2025
खरबूज पिका साठी रेडी आहे 3 acer लवकर लागवड पूर्ण करतो
17/11/2025

खरबूज पिका साठी रेडी आहे 3 acer लवकर लागवड पूर्ण करतो

08/11/2025
नवीन पिकाचे नियोजन केले आहे
04/11/2025

नवीन पिकाचे नियोजन केले आहे

20/09/2025

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
*काबुली हरबरा नियोजन*
काबुली हरबरा लागवड करणार असाल तर आपल्याला भारी जमीन निवडावी लागेल, लागवड करताना दोन ओळीतील अंतर ४५ सेमी व दोन झाडांतील अंतर १० सेमी याप्रमाणे करावी, अंतर जास्त ठेवल्यास झाडांची संख्या कमी होते व एकंदरित उत्पादन कमी मिळते त्यामुळे शक्यतो अंतर कमी म्हणजे योग्य ठेवणे व झाडांची संख्या राखणे आवश्यक आहे.
*काबुली हरभरा वाण*
# टपोरा दाणा - फुले कृपा आणि PKV - 4 (पिकेव्हि- ४ )
# मध्यम टपोरा दाणा - PKV - 2 ( पीकेव्ही - २)
# लहान दाणा - विराट
मध्यम जमीन असल्यास PKV-2 ची निवड करू शकता.
👉🏻 एकरी बियाणे पेरणी साठी ३५-४० किलो ( उगवण क्षमता तपासून पाहणे) तसेच कमी उगवण क्षमता असेल तर थोडे जास्त बियाणे टाकणे.
👉🏻 बीज प्रक्रिया हा खूप महत्वाचा भाग आहे हरबरा लागवड करत असताना, मर रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे त्यासाठी
Carbendazim 25 %+ Mancozeb 50 % WS (Sprint) 3 ग्राम प्रती किलो किंवा Carbendazim २-३ ग्रॅम प्रति किलो किंवा Thiophanate Methyl 45% + Pyraclostrobin 5% FS (xelora) २-३ ml प्रती किलो किंवा Penflufen 13.28% ww + Trifloxystrobin 13.28% ww FS, (Ever gol extend ) ० .५ ते १ ml प्रती किलो बियाणे तसेच Thimethoxum ३० FS ५ -७ ml प्रती किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
👉🏻त्यानंतर पेरणी करण्याच्या १ तास अगोदर Rhizobium ( जैविक खत ) २०० -२५० ग्रॅम १० किलो बियाण्यास याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी व सावली मध्ये वाळवून नंतर पेरणी करावी
👉🏻 पेरणी करत असताना किंवा नंतर Trichoderma viridi एकरी ४-५ लिटर किंवा किलो गांडूळ खतामद्ये मिसळून टाकावे किंवा sprinkler च्या पाण्यातून सोडावे मर व कॉलर रॉट या दोनही रोगांच्या नियंत्रणासाठी प्रभावी जैविक बुरशीनाशक म्हणून trichoderma viridi काम करते त्यामुळे त्याचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते
👉🏻हरबरा पीकामध्ये मर रोग व्यवस्थापन महत्वाचे आहे त्यासाठी बीजप्रक्रिया करणे खूप महत्त्वाचे आहे वरील प्रमाणे बीजप्रक्रिया करावी व पेरणी नंतर १०-१५ दिवसांनी Trichoderma viridi चे ड्रेंचींग करावे ( पाण्यासोबत) किंवा १०-२० किलो ओली माती किंवा ५० किलो गांडूळ खत किंवा शेणखत घेऊन त्यामधे ४ किलो किंवा ४ लिटर trichoderma viridi यांचे मिश्रण बनवून शेतामध्ये ओलावा असताना धुरळणी करावी. ( हे सर्व रोग येण्यापूर्वी करणे अपेक्षित आहे)
👉🏻 काबुली हरबरा नियोजन करत असताना सुरवातीला २०-३० दिवसांनी एक फवारणी १९:१९:१९ १०० gm प्रती पंप व ५०-६० दिवसांनी ०:५२:३४ १०० gm प्रती पंप याप्रमाणे फवारणी करावी, तसेच पीक फुल अवस्थेत असताना एक Gebrelic acid ची फवारणी करू शकता, व गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा.
👉🏻खत पेरणी च्यां वेळी द्यावे व गरज असल्यास नंतर झिंक सल्फेट किंवा फेरस सल्फेट चा वापर करावा ( २५-३० दिवसांनी )
पाणी जास्त प्रमाणात देऊ नये व शेवटी एक फवारणी ortho silicic acid ची केल्यास लवकर वाळणे यावर आपल्याला नियंत्रण आणता येईल व दाणा जाड होईल, वरील प्रमाणे व्यवस्थापन केल्यास नक्कीच चांगले उत्पादन मिळेल.
धन्यवाद 🙏🏻

🌱 *कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना!*शेतकरी बांधवांनो! आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि अमेरिकेच्या आयात शुल्क...
20/09/2025

🌱 *कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना!*

शेतकरी बांधवांनो! आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे यंदा तुमच्या कापसाला खरी सुरक्षा फक्त हमीभावावरच मिळणार आहे. त्यामुळे Cotton Corporation of India (CCI) कडे नोंदणी करणे अतिशय गरजेचे आहे.

💰हवीभाव किती मिळेल?
८११०(लांब धाग्याचा कापूस) रु. - ७७१० रु.(मध्यम धाग्याचा कापूस)

⏰ नोंदणी शेवट तारिख: ३० सप्टेंबर २०२५

👉 नोंदणी कुठे कराल?
📲 “Kapas Kisan App” वर

👉 नोंदणी कशी कराल?
- Kapas Kisan App डाउनलोड करा (Play Store / App Store).

- मोबाईल नंबर टाका, OTP भरा.

- शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती, शेताची माहिती व गट क्र. तपशील भरा.

- आधार, शेतकऱ्यांचा फोटो आणि 7/12 Pdf अपलोड करा.

- Submit करा आणि नोंदणी पूर्ण करा.

Address

Grace Gaurav Appartment Karla Road Wardha
Wardha
442001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when AgroVriksh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category